तुम्ही महाराष्ट्रभर फिरतात, मुख्यमंत्री एकाच ठिकाणी बसून! यावर काय म्हणाले शरद पवार

तुम्ही महाराष्ट्रभर फिरतात, मुख्यमंत्री एकाच ठिकाणी बसून! यावर काय म्हणाले शरद पवार

लातूरात भूकंप आला होता तेव्हा पवारांनी मुख्यमंत्री कार्यालय लातूरात हलवलं होतं. परंतु मुख्यमंत्री कुठेही जात नाही, असा सवाल विरोधक करत आहेत.

  • Share this:

औरंगाबाद, 25 जुलै: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सर्वेसर्वा शरद पवार हे राज्यभर दौरा करत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या शहरांना भेट देऊन शरद पवार तेथील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आहेत. शरद पवार यांना शुक्रवारी नाशिकचा दौरा केला होता. नंतर ते शनिवारी औरंगाबाद शहरातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते.

हेही वाचा...'कितीही संकट येवो, लोकांसाठी झोकून काम करणं, हीच शिवसेनेची खरी ओळख'

चिंताजनक परिस्थिती...

औरंगाबादमध्येही कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे. आवश्यक ती उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. तसेच कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर बेड्सची संख्या वाढवण्याची गरज असल्याचंही पवार म्हणाले. शहर आणि ग्रामीण या दोन्हीही ठिकाणी लोकांची सहकार्याची भूमिका आहे. आपण लवकरच संकटावर मात करु, असा विश्वास देखील पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोना काळात एकही दौरा केला ही. ते एका ठिकाणी बसूनच राज्यातील कामकाज पाहत आहेत. यावर विरोधकांकडून कडाडून टीका होत आहे. मी महाराष्ट्रभर फिरतोय, मुख्यमंत्री एकाच ठिकाणी बसून आहेत, या मागील कारण सांगून शरद पवार यांनी विरोधकांची बोलती बंद केली.

लातूरात भूकंप आला होता तेव्हा पवारांनी मुख्यमंत्री कार्यालय लातूरात हलवलं होतं. परंतु मुख्यमंत्री कुठेही जात नाही, असा सवाल विरोधक करत आहेत. यावर शरद पवार यांनी सांगितलं की, लातूरचा भूकंप होता, तर तो एका जिल्ह्याचा भाग होता. आताचं संकट हे संपूर्ण राज्यातील आहे. यामुळे मुख्यमंत्री एकाच भागात जाऊन बसले तर, निर्णय प्रक्रियेत अडचणी निर्माण होतील. यामुळे कॅप्टनने मुख्य ठिकाणी बसून सर्वांवर लक्ष ठेवावे, जी कमतरता असेल ती सांगावी, असा आमचा आग्रह आहे. आता पालकमंत्री इथून गेले तर ते मुख्यमंत्री आणि त्यांच्या संबंधीत गोष्टींशी चर्चा करतील. ही कमतरता आहे ती पूर्ण करा, मी देखील मुख्यमंत्र्यांना भेटून कमतरतांविषयी सांगेल. यामुळे त्यांनी एका ठिकाणी बसून लक्ष ठेवणं गरजेचं असल्याचं शरद पवार म्हणाले.

हेही वाचा...5 ऑगस्टला राज्यात मंदिरं उघडण्यासाठी भाजप मागणी, मुख्यमंत्र्यांना दिलं पत्र

राज्यातील परिस्थितीचा आढावा घेणे महत्त्वाचं आहं. यासाठी मी दौरे करतोय, मला करमत नाही, मला एका जागेवर बसवत नाही. मी सतत लोकांमध्ये फिरणारा माणूस आहे. मला लोकांशी बोलत राहण्याची सवय आहे. यामुळे मी फिरत असतो. जिथे संकट आलं तिथे मी जातो. चौकशी करणं, मदत करणं, या भावनेतून मी फिरतोय, असं शरद पवारांनी सांगितलं.

Published by: Sandip Parolekar
First published: July 25, 2020, 7:26 PM IST

ताज्या बातम्या