मुंबई, 25 जुलै: मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात या 25 रुग्णवाहिकांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमीत्त मुंबई शिवसेनेतर्फे 25 रुग्णवाहिका मुंबईतील शिवसेनेच्या 12 विभागांना देण्यात येणार आहेत. कोरोना संसर्गग्रस्त आणि इतर आजारी रुग्णांसाठी या रुग्णंवाहिका 24 तास सेवेत कार्यरत राहाणार आहेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या प्रयत्नातून ही आरोग्य सेवा सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. हेही वाचा… दिलासादायक! पंढरपूरची धारावी ‘महापूरचाळ’ अवघ्या 15 दिवसांत झाली कोरोनामुक्त मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं की, ‘गुगल’द्वारे आता शिक्षण सुरू करणारं महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य आहे. मुंबईच्या आरोग्य परिस्थितीची थेट दखल जागतिक आरोग्य संघटनेनंही (WHO)घेतली आहे. जूना काळ मला आठवतो, इतर कोणत्याही पक्षांच्या रुग्णवाहिका नव्हत्या तेव्हा फक्त शिवसेनेच्या रुग्णवाहिका होत्या. कितीही संकट येवो, आपल्या नागरिकांसाठी झोकून काम करणं, हीच शिवसेनेची खरी ओळख आहे. नागरिकांची मदत करताना आपल्या आरोग्याचीही काळजी घ्या, असंही मुख्यमंत्र्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. कोरोना काळात लोकांना वाचवताना आपले काही शिवसैनिकही आपल्याला सोडून गेलेत, असं सांगून मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. हेही वाचा… सोशल मीडिया स्टार आजीची थेट गृहमंत्र्यांनी घेतली भेट, साडी-चोळीसह दिले सव्वा लाख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे… - मास्क काढून मी माईकसमोर बोलत आहे. - अभिमान आहे की शिवसेनेची ओळख संकटात जीवाची पर्वा न करता झोकून देणे. - शिवसेनेच्या रुग्णवाहिका याबाबत किती मी सांगायचं? - जुना काळ आठवला प्रत्येक शाखेच्या रुग्णवाहिकासेवा होती तेच कोणत्याच राजकीय पक्षाची नव्हती -कोविड पेशंट असता तरी कोणाला प्रसार होणार नाही अशी सेवा त्यात आहे -आधुनिक साधनांची ही रुग्णवाहिका आहे -मुख्यमंत्री हे कोणाचे कसे लाडके होतात ते माहीत नाही -जागतिक स्तरावर आपल्या कामाचा उल्लेख झाला आहार -अनेक गोष्टींच लोकार्पण आपण केलं -गुगलने अभ्यासाची सुरुवात आज आपण केली आणि महाराष्ट्र एकमेव आहे जे हे करतंय -खड्डे, खडके, काटे आपल्याला तोचनार नाही -संकट कितीही असलं तरी आपण मैदानात आहोत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.