मुंबई, 25 जुलै : राज्यात कोरोनामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊन लागू झाल्यापासून संपूर्ण देशात धार्मिक स्थळं बंद आहेत. पण 5 ऑगस्टला पुर्ण राज्यात मंदिर उघडण्यासाठी परवाणगी द्यावी अशी मागणी महाराष्ट्राचे भाजप नेते संजय पांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
संजय पांडे यांनी पत्रात 5 ऑगस्टला महाराष्ट्रात राम भक्तांसाठी मंदिर खुली करण्याची मागणी केली आहे.भगवान राम यांचे जन्मस्थळ असलेल्या अयोध्यामध्ये राम मंदिराचे भूमिपूजन 5 ऑगस्टला होणार आहे. पण अशा प्रकारे कोरोना कालावधीत महाराष्ट्रातील रामभक्त अयोध्येत पोहोचू शकत नाहीत, म्हणून मुख्यमंत्र्यांनी सोशल डिस्टंसिंगचे नियम ठेवत सर्व मंदिरं खुली करण्याची मागणी केली आहे.
पुण्यात होऊ शकतो विकेंड लॉकडाऊन, जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिली माहिती
दरम्यान, अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या तयारीला आता वेग आला आहे. गेल्या 500 वर्षांमध्ये असा मुहूर्त आला नाही तो 5 ऑगस्टला आला आहे. यासाठी अयोध्येत जय्यत तयारीत करण्यात आली आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाला राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय गदारोळ पाहण्यास मिळत आहे. भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना शरद पवारांच्या एनओसीची गरज नाही, असं म्हणून टीका केली होती. त्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून 'रामायण' या शिर्षकाखाली अग्रलेखही प्रसिद्ध करण्यात आला. या अग्रलेखातून भाजपवर पलटवार करण्यात आला होता.
आता पाकिस्तानही बनवणार जीवघेणा व्हायरस, चीनशी झाला गुप्त करार
'आज विरोधाभास कसा आहे तो पहा. बाबरी तोडून जेथे राममंदिराची पायाभरणी होत आहे, त्या सोहळ्यास पंतप्रधान मोदी येत आहेत, पण बाबरी पाडल्याच्या कटाचा खटला आजही लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह अनेकांवर सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमीबाबत निकाल दिल्यावरही बाबरी विध्वंसाचा खटला सीबीआय चालवते व त्यात अयोध्या आंदोलनाचे प्रमुख नेते अडवाणी आरोपी म्हणून हजर राहतात. हा कायद्याचा कसला खेळ मानावा!' असं सवाल उपस्थितीत करत भाजपला टोला लगावला होता.
तसंच, 'बाबरी कटाचा खटलाच राममंदिर भूमिपूजनापूर्वी बरखास्त केला तर आंदोलनात शहीद झालेल्यांना ती मानवंदना ठरेल. बाबर हा आक्रमक होता हे एकदा स्वीकारल्यावर बाबरी विध्वंसाचा कट रचला, हा खटलाच गतप्राण होतो, पण रामजन्मभूमीच्या पेचात अडकलेले बाबरी विध्वंस कटाचे त्रांगडे काढायला तयार नाही.' असंही सेनेनं म्हटलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Ram Mandir, Ram mandir ayodhya, Uddhav thackeray