मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO : लाखोंचा जनसागर, सिनेअभिनेता गोविंदा थिरकला, अमरावतीत राणा दाम्पत्याकडून भव्य कार्यक्रमाचं आयोजन

VIDEO : लाखोंचा जनसागर, सिनेअभिनेता गोविंदा थिरकला, अमरावतीत राणा दाम्पत्याकडून भव्य कार्यक्रमाचं आयोजन

अमरावतीत राणा दाम्पत्याकडून आयोजित कार्यक्रमात गोविंदाचं नृत्य

अमरावतीत राणा दाम्पत्याकडून आयोजित कार्यक्रमात गोविंदाचं नृत्य

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती बडनेराचे आमदार रवी राणा यांन आज अमरावतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रक्ततुलाचा आणि दहीहंडीचा एकत्रित कार्यक्रम आयोजित केला होता.

  • Published by:  Chetan Patil

अमरावती, 21 ऑगस्ट : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती बडनेराचे आमदार रवी राणा यांन आज अमरावतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रक्ततुलाचा आणि दहीहंडीचा एकत्रित कार्यक्रम आयोजित केला होता. अतिशय भव्य असा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सिनेअभिनेता गोविंदा यानेदेखील हजेरी लावली होती. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाला अमरावती जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी हजेरी लावली होती.

या कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढच्या निवडणुकीत भाजपचाच आमदार-खासदार निवडून येईल, अशी घोषणी केली. तर फडणवीसांनी महाविकास आघाडीवर टीका केली आणि राणा दाम्पत्याच्या कामांचं कौतुक केलं. त्यानंतर अभिनेता गोविंदाने दोन मिनिटाचं भाषण करत उपस्थितांचं मनोरंजन केलं. यावेळी गोविदाने डान्सदेखील करा. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित तरुणाई देखील थिरकली.

(राणा दाम्पत्य लवकरच भाजपमध्ये! शिंदेंकडे गेलेल्या अडसुळांना धक्का)

देवेंद्र फडणवीसांची महाविकास आघाडीवर टीका

या कार्यक्रमात भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. "आपलं सरकार आल्यापासून खुलंखुलं वाटतंय. आता सर्व सण साजरी होणार. आपलं सरकार कुणालाही हनुमान चालीसा म्हटलं म्हणून जेलमध्ये टाकणार नाही", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

"रवी राणा आणि नवनीत राणा यांचा अभिनंदन करतो. ज्यावेळी हनुमानाचा जयजयकार करणं या महाराष्ट्रात पाप झालं होतं त्यावेळी राणा दाम्पत्य मैदानात आले. त्यांनी सांगितलं, आम्हाला जेलमध्ये टाका. हनुमान चालीसा म्हटल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने प्रत्येक भारतीयापर्यंत विकास पोहोचवायचा आहे. आम्ही सर्व तुमच्या पाठिशी आहोत. चिंता करु नका. आज फक्त दहीहंडीचा उत्सव नाही तर रक्तदान करण्यात आलं", असंदेखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

First published:

Tags: BJP, Devendra Fadnavis, Navneet Rana, Ravi rana