मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राणा दाम्पत्य लवकरच भाजपमध्ये! शिंदेंकडे गेलेल्या अडसुळांना धक्का

राणा दाम्पत्य लवकरच भाजपमध्ये! शिंदेंकडे गेलेल्या अडसुळांना धक्का

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या (Chandrashekhar Bavankule) वक्तव्यामुळे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि बडनेऱ्याचे आमदार रवी राणा (Ravi Rana) हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. पण यामुळे शिंदे गटात गेलेल्या आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांची अडचण होणार आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

अमरावती, 21 ऑगस्ट : अमरावतीचा पुढचा खासदार हा भाजपचा (Amravati BJP MP) असेल, तर बडनेराचा आमदारही भाजपचाच राहील अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी केली आहे. बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि बडनेऱ्याचे आमदार रवी राणा (Ravi Rana) हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. अमरावतीमधल्या राणा दाम्पत्यांच्या दहीहंडी कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

खासदार नवनीत राणा या 2019 लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अमरावतीमधून निवडून आल्या, तर त्यांचे पती रवी राणा हेदेखील बडनेरा मतदारसंघातून विधानसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेले. निवडणुकीनंतर मात्र त्यांनी भाजपसाठी अनुकूल अशी भूमिका घेतली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मातोश्री या त्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा वाचणार असल्याचं आव्हान राणा दाम्पत्याने केलं, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. या वादानंतर दोघांवरही राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती.

अडसुळांची अडचण

अमरावतीचा पुढचा खासदार आणि बडनेऱ्याचा आमदार भाजपचाच असेल, अशी घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्यामुळे आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांची अडचण होऊ शकते. 2019 लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनीच शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. महाराष्ट्रामध्ये जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंड केलं तेव्हा आनंदराव अडसुळांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर एकनाथ शिंदे यांनी अडसुळांची नेतेपदी निवड केली.

आता राणा दाम्पत्याने भाजपमध्ये प्रवेश केला तर एकनाथ शिंदे आणि आनंदराव अडसूळ ही जागा भाजपसाठी सोडणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राणांचं शक्तीप्रदर्शन

राणा दाम्पत्याने अमरावतीमध्ये दहीहंडीचं आयोजन करून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे. राणा दाम्पत्याच्या या दहीहंडी कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावली. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांची रक्ततुला करण्यात आली. मंचावर सिने अभिनेता गोविंदा, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, नवनीत राणा, अनिल बोंडे, रामदास तडस उपस्थित होते.

बच्चू कडूंना टोला

दरम्यान या कार्यक्रमातून रवी राणा यांनी बच्चू कडू यांना टोला लगावला. मंत्रिपद मिळावं म्हणून दबाव आणणार नाही किंवा गुवाहाटीला जाणार नाही. मंत्रिपद मिळो अथवा न मिळो मी कायम देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिपाई बनून राहीन, असं रवी राणा म्हणाले.

First published:

Tags: BJP, Navneet Rana, Ravi rana