जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / political news : शिवसेनेच्या जाहिरातीत काय चुकलं? पवारांनी स्पष्टपणेच सांगितलं

political news : शिवसेनेच्या जाहिरातीत काय चुकलं? पवारांनी स्पष्टपणेच सांगितलं

(शरद पवार )

(शरद पवार )

‘शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत रेल्वेनं प्रवास केला होता. त्यांच्या प्रवास करून मला ही आनंद झाला’

  • -MIN READ Nashik,Maharashtra
  • Last Updated :

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक, 16 जून : ’ राज्य सरकारने जाहिरात देऊन चूक केली. सध्याच्या सरकारमध्ये मोठी संख्या ही भाजपची आहे. सरकारमध्ये सर्वाधिक योगदान हे भाजपचे नाही, असे या जाहिरातीमधून समोर आले, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारच्या जाहिरात प्रकरणावर भाष्य केलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे नाशिकच्या दौऱ्यावर आहे. आज पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी शिवसेना आणि भाजपमधील जाहिरात वादावर भाष्य केलं आहे. शिंदे सरकारकडून देशात मोदी राज्यात शिंदे अशी जाहिरात देण्यात आली. या जाहिराती फडणवीस यांचा फोटो वगळण्यात आला होता. मुळात राज्य सरकारने जाहिरात देऊन चूक केली. मोठी संख्या यात भाजपची आहे. सरकारमध्ये सर्वाधिक योगदान हे भाजपचे नाही असे या जाहिरातीमधून समोर आले आहे, असं म्हणत पवारांनी युतीला डिवचलं आहे. (कर्नाटकने अभ्यासक्रम बदलला, भाजपच्या निशाण्यावर उद्धव ठाकरे; फडणवीस म्हणाले, आता….) पक्ष संघटनेचा आढावा जयंत पाटील आणि अजित पवार घेत आहेत. सर्व विभागच्या पदाधिकारी यांचा आढावा घेतला आहे. अमळनेरला इतिहास आहे साने गुरुजीचा म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला. सध्या जे सत्ताधारी आहे, समाजाच्या वातावरणासाठी घातक आहे, अजित पवारांचे मत असू शकते त्यांनी समान नागरिक कायदा आणायचे स्वरूप लक्षात घ्यावे लागेल, अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली. शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत रेल्वेनं प्रवास केला होता. त्यांच्या प्रवास करून मला ही आनंद झाला. त्यांनी सरकारच्या पाण्याबद्दल असलेल्या योजनेबद्दल माहिती दिली, असा खुलासाही पवारांनी केला. कर्नाटकमध्ये हेगडेवारांचे धडे काढले आहेत. त्यावर बोलताना लहान वयात मुलांवर चांगला संस्कार झाले पाहिजे. काँग्रेसने जाहिरनाम्यात सांगितले होते. त्यावर जनतेने बहुमत दिले आणि ते आता पूर्ण करत आहात, असं म्हणत पवारांनी कर्नाटक सरकारच्या भूमिकेचं समर्थक केलं आहे. (कर्नाटकने सावरकर अन् हेडगेवार यांचे धडे वगळले, भाजपने साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा ) संपूर्ण देशात परिवर्तन चे वातावरण आहे. लोकांना हल्लीच्या राजकारणात सत्ता देऊ नये असे वाटते. देशाचा नकाशा डोळ्यासमोर ठेवा कुठे भाजप आहे हे कळेल. मध्यप्रदेश मध्ये भाजपची सत्ता नव्हती पण खोके दिल्यामुळे सत्ता आली आहे. मोठी आश्वासन द्यायची आणि पूर्ण करायची नाही, बेरोजगारी याकडे लक्ष न दिल्याने बदल होऊ शकतो, असंही पवार म्हणाले. विदर्भ मराठवाडा आणि खान्देश या ठिकाणी 50 टक्के कापूस घरात आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित किंमत मिळत नाहीये. सोयाबीननव इतर पिकाबाबतीत आहे. उत्पन्न दुपट्ट करावे असे म्हणणारे सरकार अपयशी ठरले आहे. दोन एजन्सी नाफेड आणि कॉटन फेडरेशन यांना खरेदी करायला सांगितले पाहिजे. आता शेतीसाठी लागणारी पैसे कापसातून येणार होते पण सध्या याबाबतीत शेतकरी उद्धवस्त होत आहेत. केंद्र सरकारने उतपन्न दुप्पट करणार असे सांगितले होते. त्यासाठी यंत्रणा उभी केली पाहिजे, असा सल्लाही पवारांनी दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात