नाशिक, 02 डिसेंबर : शिवसेना खासदार संजय राऊत हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचा हा दौरा महत्त्वाचा असून या दौऱ्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना थेट आव्हान दिलं आहे. हेमंत गोडसे यांनी पुन्हा लोकसभेला निवडून येऊन दाखवावं असं संजय राऊत म्हणाले.
शिवसेनेचे ४० आमदार गेले, १३ खासदार गेले तरी शिवसेने अजूनही तशीच आहे. मी लोकांमध्ये जातोय, तेव्हा शिवसेनेबद्दल लोकांच्या मनात आदराची भावना असल्याचं दिसतंय. नाशिकमध्ये कार्यकर्ते, पदाधिकारी भेटतायत. सर्वसामान्य जनता भेटते. सगळे आपआपल्या जागेवर आहेत. चिंता करण्याची गरज नाहीय. थोडा पालापाचोळा उडाला आहे पण शिवसेना आणि शिवसैनिक आपआपल्या जागी आहेत असंही संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा : 'मंदिरे लुटता आणि हिंदुत्वावर बोलता'; मनसेचा ठाकरे गटावर गंभीर आरोप
लोकसभा खासदार हेमतं गोडसे यांच्यावर टीका करताना संजय राऊत यांनी ओपन चॅलेंजही दिलं. ते म्हणाले की, "नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी पुन्हा लोकसभेत निवडून येऊन दाखवावं. त्यांचे राजकीय करिअर संपले आहे. खासदार गोडसे हे तिकडे गेल्यानतंर तर प्यारे झाले आहेत. आता त्यांची राजकीय कारकिर्द संपुष्टात आलीय. आता त्यांनी स्वत:ची कबर खोदली आहे."
हेही वाचा : अखेर जत तालुक्याला न्याय मिळणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मोठी घोषणा
गोडसे शिंदे गटात गेले, नाशिकला लोकसभेचा चेहरा कोण असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. यावर संजय राऊत म्हणाले की, हेमंत गोडसे हे काय चेहरा आहेत का? शिवसेनेत चेहरा वगैरे काही नाही. शिवसेना हाच चेहरा आणि शिवसैनिक हीच आमची ताकद आहे. शिवसैनिकच आमदार-खासदार निवडून देतात आणि ते आमच्यासोबत असल्याने आम्हाला चिंता नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra politics, Nashik, Politics, Sanjay raut, Shivsena