जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सत्यजीत तांबेंसाठी दादांकडून डॅमेज कंट्रोल! पण नाना अजित पवारांवरच बरसले!

सत्यजीत तांबेंसाठी दादांकडून डॅमेज कंट्रोल! पण नाना अजित पवारांवरच बरसले!

सत्यजीत तांबेंसाठी दादांकडून डॅमेज कंट्रोल! पण नाना अजित पवारांवरच बरसले!

सत्यजीत तांबे यांनी केलेल्या बंडाचे पडसाद महाविकासआघाडीमध्येही उमटताना दिसत आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष निवडणूक जिंकलेल्या सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर घणाघात केला आहे.

  • -MIN READ Nashik,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 4 फेब्रुवारी : सत्यजीत तांबे यांनी केलेल्या बंडाचे पडसाद महाविकासआघाडीमध्येही उमटताना दिसत आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष निवडणूक जिंकलेल्या सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर घणाघात केला आहे. सत्यजीत तांबेंनी केलेल्या आरोपांना आमचे प्रवक्तेच प्रत्युत्तर देतील, असं नाना पटोले म्हणाले, पण यावेळी त्यांनी अजित पवारांवरच निशाणा साधला. घरातलं भांडण चव्हाट्यावर आणण्याचं काम अजित पवारांनी केल्याचं टीकास्त्र नाना पटोलेंनी सोडलं आहे. काय म्हणाले होते अजित पवार? सत्यजीत तांबे काँग्रेस सोडून जाणार नाही, तो काँग्रेसचा सहयोगी आमदार असेल, कारण त्यांच्या रक्तात काँग्रेस आहे, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. त्यावर याबाबतचा निर्णय काँग्रेस हायकमांड घेईल, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. हे सांगत असतानाच नाना पटोले यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. ‘देवेंद्र फडणवीस मोठ्या भावासारखे’, सत्यजीत तांबेंनी सांगितली भविष्यातील रणनीती ‘अजित पवारांनी आमच्यावर टीका केली. आमचे नेते पृथ्वीराज चव्हाण साहेबांवर टीका केली. ते महाविकासआघाडीमध्ये आहे, तरीही सांगतात या उमेदवाराला आम्ही मतं दिली. तांबेंच्या घरातलं भांडण होतं, त्याला चव्हाट्यावर आणण्याचं काम अजित पवार करत आहेत. मी बाळासाहेब थोरातांना सांगितलं, नाना पटोलेंना सांगितलं, असं ते म्हणतात. उद्धव ठाकरेंचं सरकार पडत होतं, मी सांगितलं होतं, असंही अजित पवार म्हणतात. तुम्हाहा माहिती होतं, तुमच्याकडेच गृहखातं होतं,’ असा घणाघात नाना पटोले यांनी अजित पवारांवर केला आहे.

अजितदादांकडून डॅमेज कंट्रोल दुसरीकडे अजित पवारांनी सत्यजीत तांबेंना सबुरीचा सल्ला दिला आहे. ‘आज सकाळी माझं आणि सत्यजीत तांबेंचं बोलणं झालं. त्यांना विनंती केली की तुम्ही तरुण आहात, तुम्हाला पुढचं उज्ज्वल भवितव्य आहे, त्यामुळे शांतपणे आणि बारकाईने विचार करून रणनीती ठरवा. वाटल्यास मंगळवारी, बुधवारी मी मुंबईत आहे, त्यावेळी आपण भेटून बोलू,’ असं अजित पवार यांनी सत्यजीत तांबे यांना सांगितलं आहे. षडयंत्रांची स्क्रीप्ट कशी लिहिली गेली? सत्यजीत तांबेंचे पटोलेंवर गंभीर आरोप

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात