नाशिक, 4 फेब्रुवारी : नाशिक पदवीधर मतदारसंघामधून निवडणूक जिंकल्यानंतर सत्यजीत तांबे यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत, तसंच आपल्याला आणि आपल्या परिवाराला भाजपकडे ढकलण्याचे प्रयत्न केले गेल्याची टीकाही सत्यजीत तांबे यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस हे आपल्याला मोठ्या भावासारखे असल्याचं सूचक विधान सत्यजीत तांबे यांनी केलं आहे. ‘माझ्या पुस्तक प्रकाशनाला मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह अजितदादांनाही आमंत्रित केलं होतं. तेव्हा देवेंद्रजी सत्यजीतला संधी द्या, नाहीतर आमचा डोळा त्यांच्यावर जाईल, असं बोलले. त्यावरून चर्चा झाली. सभागृहातदेखील दाद मिळाली. आमची भावना त्यांनी बोलून दाखवली. ते मला मोठ्या भावासारखे आहेत’, असं सूचक विधान सत्यजीत तांबे यांनी केलं.
अपक्षच राहणार अनेक संघटनांनी मला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे मी अपक्षच राहीन, देवेंद्रजी अजितदादा, पवार साहेब सगळ्यांची मदत मी मागितली, असं सत्यजीत तांबे यांनी सांगितलं. षडयंत्रांची स्क्रीप्ट कशी लिहिली गेली? सत्यजीत तांबेंचे पटोलेंवर गंभीर आरोप