लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधीनाशिक, 20 मे : गेल्या 24 तासांत नाशिकमध्ये दोन तरुणांची निर्घृण हत्या (youth brutally murder) करण्यात आली आहे. नाशिक (Nashik)मध्ये सुरू असलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिकच्या पूर्णिमा बस स्टॉप परिसरात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. लुटमारीच्या उद्देशाने हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. हत्येची ही घटना घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (caught in CCTV) झाली आहे.
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी हत्याकांड घडलं आहे. हरीश पटेल असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. हत्या झालेला हरीश पटेल हा युवक पुणे येथील राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. अवघ्या 24 तासांत नाशिक शहरात दुसरी हत्या घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाले आहेत.
म्हसरूळमध्ये 24 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या
नाशिकमध्ये एका 24 वर्षीय तरुणाची काल (19 मे) निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तरुणाच्या पोटात धारदार शस्त्राने वार करुन संपवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नाशिकमधील म्हसरूळ परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृतक तरुणाचे नाव राजेंद्र गांगुर्डे असं आहे. राजेंद्र गांगुर्डे हा 24 वर्षीय होता. पूर्ववैमनस्यातून आणि वर्चस्वाच्या वादातून राजेंद्र गांगुर्डे याची हत्या करण्यात आली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
राजेंद्रच्या पोटात धारदार शस्त्राने वार केले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
पंचवटी परिसरात वडील आणि मुलाची आत्महत्या
नाशिकमधील पंचवटी परिसरात वडील आणि मुलाने आत्महत्या केली आहे. वडील आणि मुलाच्या सामूहिक आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. काल (19 मे) ही घटना उघडकीस आली. नाशिकमधील पंचवटी परिसरात ही घटना घडली आहे. जगदीश जाधव आणि प्रणव जाधव अशी मृतक वडील-मुलाचे नाव आहे. जगदीश जाधव आणि प्रणव जाधव यांनी नाशिकमधील आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. मात्र, दोघांनी आत्महत्या का केली? आत्महत्या करण्यामागचं नेमकं कारण काय आहे? याबाबत माहिती समोर आलेली नाहीये.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.