लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी
नाशिक, 19 मे : नाशिकमध्ये एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिकमधील पंचवटी परिसरात (Panchvati area of Nashik) वडील आणि मुलाने आत्महत्या (Father and Son suicide) केली आहे. वडील आणि मुलाच्या सामूहिक आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. (Father and son suicide in Nashik)
नाशिकमधील पंचवटी परिसरात ही घटना घडली आहे. जगदीश जाधव आणि प्रणव जाधव अशी मृतक वडील-मुलाचे नाव आहे. जगदीश जाधव आणि प्रणव जाधव यांनी नाशिकमधील आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. मात्र, दोघांनी आत्महत्या का केली? आत्महत्या करण्यामागचं नेमकं कारण काय आहे? याबाबत माहिती समोर आलेली नाहीये.
म्हसरूळमध्ये 24 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या
नाशिकमध्ये एका 24 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तरुणाच्या पोटात धारदार शस्त्राने वार करुन संपवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नाशिकमधील म्हसरूळ परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृतक तरुणाचे नाव राजेंद्र गांगुर्डे असं आहे. राजेंद्र गांगुर्डे हा 24 वर्षीय होता. पूर्ववैमनस्यातून आणि वर्चस्वाच्या वादातून राजेंद्र गांगुर्डे याची हत्या करण्यात आली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
राजेंद्रच्या पोटात धारदार शस्त्राने वार केले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
मनमाडमध्ये बहिणीने सपासप वार करून भावाला संपवलं
भाऊ नेहमी शिवीगाळ, मारहाण करून त्रास देत असल्यामुळे त्याच्या त्रासाला कंटाळून बहिणीने टोकाचे पाऊल उचलत थेट लहान भावाच्या पोटावर चाकूने वार करुन त्याचा निर्घृणपणे खून केल्याची खळबळजनक आणि धक्कादायक घटना मनमाडमध्ये काही दिवसांपूर्वी घडली होती. भाऊ बहिणीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विवेकानंद नगर क्र.2 या भागात ही घटना घडली. संदीप गोंगे (वय 45) असं मयताचे नाव असून खून केल्यानंतर आरोपी बहिण शोभा गारुडकर(वय 55) स्वतः पोलीस स्थानक हजर झाली आणि मी माझ्या भावाचा खून केल्याची तीने कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिले विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Nashik, Suicide