मराठी बातम्या /बातम्या /nashik /Nashik Crime: नाशिकच्या म्हसरूळमध्ये 24 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या, हत्याकांडाने खळबळ

Nashik Crime: नाशिकच्या म्हसरूळमध्ये 24 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या, हत्याकांडाने खळबळ

नाशिकमध्ये 24 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या, हत्याकांडाने खळबळ

नाशिकमध्ये 24 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या, हत्याकांडाने खळबळ

Nashik crime: नाशिकमध्ये एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

 लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी

नाशिक, 19 मे : नाशिक (Nashik) जिल्ह्यात पुन्हा एकदा भीषण हत्याकांड घडलं आहे. एका 24 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या (24 year old boy brutally killed) करण्यात आली आहे. तरुणाच्या पोटात धारदार शस्त्राने वार करुन संपवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नाशिकमधील म्हसरूळ परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृतक तरुणाचे नाव राजेंद्र गांगुर्डे असं आहे. राजेंद्र गांगुर्डे हा 24 वर्षीय होता. पूर्ववैमनस्यातून आणि वर्चस्वाच्या वादातून राजेंद्र गांगुर्डे याची हत्या करण्यात आली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

वाचा : भरधाव रिक्षातून दोन विद्यार्थिनींनी घेतली उडी, एकीचा जागीच मृत्यू तर दुसरी जबर जखमी

राजेंद्रच्या पोटात धारदार शस्त्राने वार केले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

नाशिक जिल्ह्यात विहिरीत चार मृतदेह आढळल्याने खळबळ

काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये विहिरीत चार मृतदेह आढळून आले होते. नाशिक जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनेत विहिरीत चार जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेने नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

नाशिकच्या सटाणा आणि लासलगाव परिसरात घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये विहिरीत 4 मृतदेह आढळले आहेत. एका घटनेत दिर-भावजयीचा, दुसऱ्या आणि तिसऱ्या घटनेत दोन तरुणांचा मृतदेह आढळून आला आहे. नाशिकच्या ग्रामीण भागात घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमुळे खळबळ उडाली आहे. या तीन घटना निफाड, लासलगाव परिसरातील देवगाव येथे घडल्या आहेत.

एका विहिरीत पायल पोटे आणि संदीप पोटे या दोघांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. हे दोघे नात्यात दिर-भावजयी असल्याने त्यांनी आत्महत्या केली की त्यांचा खून करण्यात आला या बाबत उलट-सुलट चर्चा होत आहेत. दुसऱ्या एका विहिरीत तरुणाचा तर सटाणा येथील ठेंगोडा येथे विहिरीत शेत मजुराचा मृतदेह आढळून आला आहे.

First published:

Tags: Crime, Murder, Nashik