मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /uddhav Thackery : 'मोदी म्हणजे भारत नाही', राहुल गांधींवरील कारवाईवरून उद्धव ठाकरे कडाडले

uddhav Thackery : 'मोदी म्हणजे भारत नाही', राहुल गांधींवरील कारवाईवरून उद्धव ठाकरे कडाडले

दुसऱ्याच्या कुटुंबावर बेफाम आरोप करतात. कुणाच्या मुलावर आरोप करता. यांच्या नेत्यावर आरोप केला तर भारताचा अपमान, तुमचा नेता म्हणजे माझा भारत नाही,

दुसऱ्याच्या कुटुंबावर बेफाम आरोप करतात. कुणाच्या मुलावर आरोप करता. यांच्या नेत्यावर आरोप केला तर भारताचा अपमान, तुमचा नेता म्हणजे माझा भारत नाही,

दुसऱ्याच्या कुटुंबावर बेफाम आरोप करतात. कुणाच्या मुलावर आरोप करता. यांच्या नेत्यावर आरोप केला तर भारताचा अपमान, तुमचा नेता म्हणजे माझा भारत नाही,

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India

मालेगाव, 26 मार्च :  'तुमचा नेता म्हणजे माझा भारत असं मुळीच नाही, माझा देश इतका शुद्र नाही. मोदींवर टीका केली तर भारताच अपमान, मोदी म्हणजे भारत हे कुणाला मान्य आहे का? यांच्यासाठी क्रांतीकारी फासावर गेले आहे का, तुमच्या कुटुंबावर बोललं तर लगेच पोलिसांची कारवाई करतात, माणूस परराष्ट्रात गेला तर त्याला घेऊन येतात' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींवरील कारवाईवरून भाजपला सुनावलं.

नाशिकमधल्या मालेगाव येथे मोठी सभा होत आहे. यासाठी ठाकरे गटाच्या नेते, कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे. या सभेत उद्धव ठाकरे यांनी चौफेर तोफ डागली आहे.

('ज्यांनी गद्दारी केली, त्यांना त्याच खोक्या खाली..' संजय राऊतांचं शिवसैनिकांना आवाहन)

दुसऱ्याच्या कुटुंबावर बेफाम आरोप करतात. कुणाच्या मुलावर आरोप करता. यांच्या नेत्यावर आरोप केला तर भारताचा अपमान, तुमचा नेता म्हणजे माझा भारत नाही, माझा देश इतका शुद्र नाही. मोदींवर टीका केली तर भारताच अपमान, मोदी म्हणजे भारत हे कुणाला मान्य आहे का? यांच्यासाठी क्रांतीकारी फासावर गेले आहे का, तुमच्या कुटुंबावर बोललं तर लगेच पोलिसांची कारवाई करतात, माणूस परराष्ट्रात गेला तर त्याला घेऊन येतात, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

(BREAKING : उद्धव ठाकरेंच्या भाषणाआधी CM शिंदे पोहोचले राज ठाकरेंच्या घरी!)

'तुमचं कुटुंब तुम्हाला प्यारं आहे, तसं आमचं कुटुंब प्यारं आहे, तुम्ही जर थांबला नाहीतर तुमच्या लागीबांधी बाहेर काढावी लागतील. पण अद्याप आम्ही काढत नाही. आमचं हिंदूत्व आहे. आमच्यावर संस्कार आहे. महिला आणि मुलीवर आरोप करत नाही' असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला.

काल राहुल गांधींची पत्रकार परिषद मी पाहिली. चांगलं बोलतंय पोरगं. त्यांनी एक प्रश्न विचारलं. त्याचं उत्तर भाजपकडे नाही. फक्त राहुल गांधींना मला एक सांगायचंय. संजय राऊत तिकडे गेले. आम्ही तुमच्या सोबत होतो. आज जाहीर राहुल गांधींना सांगतो. सावरकर आमचं दैवत आहे, त्यांचा अपमान आम्हाला पटणार नाही. आम्हाला त्यांचा अपमान सहन होणार नाही' अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना सुनावलं.

सावकर काय होते, हे आपण वाचू शकतो पण त्यांनी काय केलं... चाफेकर बंधूंना फाशी दिल्यावर घरातल्या अष्टभुजा देवीसमोर जाऊन शपथ घेतो की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाच्या शत्रूला चाफेकरांसारखा मारत मारत मरेन, किंवा शिवछत्रपतींसारखा विजयी होऊन माझ्या मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा अभिषेक करेन, हे 15 वर्षी शपथ घेणारे सावरकर. त्यांच्या वाड्यात भगूरला मी शिवसेनाप्रमुखांबरोबर गेलो आहे. त्या काळातली त्यांची शस्त्र, सावकरांचे वडील हे टिळक भक्त आणि सावकरांनी जे काही केलं. ते येड्या-गबाळ्याचं काम नाही. 14 वर्ष नरकयातना, छळ त्यांनी भोगले. ते एक प्रकारचे बलिदानच आहे. म्हणून मी राहुल गांधींना सांगतोय... आपण एकत्र आलो आहोत. ते देशाच्या लोकशाही वाचवण्यासाठी.. या देशाचं संविधान वाचवण्यासाठी आलो आहोत. त्याच्यामध्ये फाटे फुटू देऊ नका. मुद्दामून तुम्हाला डिवचलं जातंय. आता जर वेळ सुटली..वेळ चुकली.. तर आपला देश हुकूमशाहीकडे गेल्याशिवाय राहणार नाही. ज्या पद्धतीने हे कारभार करताय, तो कारभार पाहिल्यानंतर जर पुन्हा हा 2024 मध्ये पुन्हा हे तिथे बसले तर त्यानंतर देशात निवडणुका होणार नाही.. देशातील लोकशाही संपली. म्हणून ही लढाई उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याची नाही तर आपल्या देशाचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

First published:
top videos

    Tags: Uddhav Thackeray