मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /BREAKING : उद्धव ठाकरेंच्या भाषणाआधी CM शिंदे पोहोचले राज ठाकरेंच्या घरी!

BREAKING : उद्धव ठाकरेंच्या भाषणाआधी CM शिंदे पोहोचले राज ठाकरेंच्या घरी!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल झाले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 26 मार्च : महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक मोठी घडामोड पाहण्यास मिळत आहे. एकीकडे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मालेगावात आज जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यांच्या भाषणाच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्जिकल स्ट्राईक केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज यांनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राज यांची पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही कार्यकर्ते उपस्थित होते.

('ज्यांनी गद्दारी केली, त्यांना त्याच खोक्या खाली..' संजय राऊतांचं शिवसैनिकांना आवाहन)

राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत महिममध्ये समुद्रात तयार झालेल्या अनधिकृत बांधकामाचा विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिला होता. यावेळी त्यांनी सरकारने हे अनधिकृत बांधकाम त्वरित हटवावे असंही सांगितलं होतं. त्यांनी ही मागणी केल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत सरकारने मुंबई महानगरपालिकेला तसे निर्देश देऊन हे अनधिकृत बांधकाम हटवले होते. त्यानंतर या दोघांमध्ये ही सदिच्छा भेट होत असल्याने या भेटीला एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.

उद्धव ठाकरेंचा भाजपला थेट सवाल

दरम्यान, मालेगावच्या सभेतून उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. यावळी 'भाजपला विचारतो, या मिंधे गटाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार आहात का, हे भाजपने जाहीर करावं, त्याही पेक्षा प्रत्येक सभेत आव्हान देत असतो. जर भाजपला असं वाटत असेल आपण ठाकरेंपासून शिवसेना तोडू शकतो, तुमचे 52 काय एकशे 52 कुळं सुद्धा ठाकरेंपासून शिवसेना वेगळी करू शकत नाही. प्रयत्न करून पाहा. मी म्हणतो निवडणुका घेऊन दाखवा, हिंमत असेल तर मोदींच्या नावाने मत मागा, मी माझ्या वडिलांना नावाने मत मागतो, मग बघू जनता कुणाला कौल देते. आज सुद्धा तुम्हाला माझ्या वडिलांचं नाव वापरावं लागतं. इथंच तुमची हार आहे. ज्या शिवसेनेनं तुम्हाला जन्म दिला, त्या राजकारणातल्या आईवर वार करणारे हे चोर आहे. हे लोक तुमच्यासमोर धनुष्यबाण घेऊन फिरणार आहे. भाजप म्हणजे भ्रष्ट जनतेचा पक्ष, असं नामकरणही उद्धव ठाकरेंनी केलं.

First published:
top videos