जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nashik Major Accident : ज्या स्कुल व्हॅनने रोज शाळेत जात होती, तिनेच 8 वर्षांच्या चिमुकलीला चिरडलं

Nashik Major Accident : ज्या स्कुल व्हॅनने रोज शाळेत जात होती, तिनेच 8 वर्षांच्या चिमुकलीला चिरडलं

Nashik Major Accident : ज्या स्कुल व्हॅनने रोज शाळेत जात होती, तिनेच 8 वर्षांच्या चिमुकलीला चिरडलं

नाशिकरोड - जेलरोड इथल्या पवारवाडी येथे स्कूल व्हॅनच्या धडकेत 8 वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

  • -MIN READ Nashik,Maharashtra
  • Last Updated :

नाशिक, 04 मार्च : नाशिकरोड - जेलरोड इथल्या पवारवाडी येथे स्कूल व्हॅनच्या धडकेत 8 वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपेक्षा नवज्योत भालेराव (रा. पवारवाडी, हरिओम दर्शन सोसायटी समोर, जेलरोड, नाशिकरोड) असे अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकरोड - जेलरोड इथल्या पवारवाडी येथे स्कूल व्हॅनच्या धडकेत 8 वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात
नाशिकमध्ये चाललं आहे तरी काय? चारित्र्याच्या संशयावरून 48 तासांत तिघांचा खून

अपेक्षा नवज्योत भालेराव (रा. पवारवाडी, हरिओम दर्शन सोसायटी समोर, जेलरोड, नाशिकरोड) असे अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे.

अपेक्षा हिला नवीन मराठी शाळेची स्कूल व्हॅन घरी सोडवण्यासाठी आली होती.स्कूल व्हॅनमधून अपेक्षा खाली उतरून व्हॅनच्या पाठीमागून घरात जात असताना व्हॅन चालकाने अचानक गाडी रिव्हर्स मागे घेतली. त्यामुळे मागच्या टायरमध्ये सापडून अपेक्षा ही गंभीर दुखापत झाली.

  पैशांची उधळण अन् पोलिसांचा लाठीचार्ज; गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा

त्यांनतर तिला औषध उपचारासाठी जयराम हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉक्टर सुनील मोकासरे यांनी तपासून तिला मृत घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात