नाशिक, 24 फेब्रुवारी : नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरूणीची छेड काढत असल्याच्या रागातून थेट खून केल्याची घटना घडली आहे. तरुण बहिणीची छेड काढत असल्याच्या रागातून मित्रांच्या मदतीने खून केला आहे.
विकास रमेश नलावडे (27) याचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला आहे. बहिणीची छेड काढल्याच्या कारणावरून काटा काढल्याची घटना बुधवारी (दि. 22) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पटांगणात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
हे ही वाचा : पैशांची उधळण अन् पोलिसांचा लाठीचार्ज; गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा
निलगिरी बाग भागात राहणाऱ्या विकास नलावडे याचा भाऊ आकाश नलावडे याने आडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित अमोल वसंत साळवे, सुनील मोरे आणि राहुल उजागिरे या तिघांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अमोल साळवे, सुनील मोरे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
नाशिक शहरात पुन्हा खूनसत्र सुरु झाले असून, कौटुंबिक वाद आणि चारित्र्याच्या संशयातून शहरात मागील दोन दिवसांत तीन हत्या झाल्याने संपूर्ण नाशिक शहर या खूनसत्राने हादरले आहे. तर रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास निलगिरी बागेत बहिणीची छेड काढली म्हणून विकास नलावडे या तरुणाचा तिघा संशयितांनी धारदार चाकूने खून केल्याने शहरात पुन्हा खुनांचे सत्र सुरु झाल्याचे दिसून येत आहे.
हे ही वाचा : तरुणीचं जीवघेणं धाडस; ट्रेनच्या खिडकीतून डोकं बाहेर काढत केलं 'हे' काम, Shocking Video
नाशिक शहरातील गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवाजीनगर येथे एका मद्यपी पतीने त्याच्या पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडा मारून हत्या केली होती. ही घटना मंगळवार (दि. 21) समोर आली होती. त्यानंतर बुधवारी (दि. 22) अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत चुंचाळे घरकुल योजना भागात पतीने पत्नीची गळा चिरुन हत्या केली व स्वतःला गळफास लावून घेत आत्महत्या केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news, Murder news, Nashik, Perfect murder