मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पैशांची उधळण अन् पोलिसांचा लाठीचार्ज; गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा

पैशांची उधळण अन् पोलिसांचा लाठीचार्ज; गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. गौतमीचा अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Ahmadnagar (Ahmednagar), India

अहमदनगर, 24 फेब्रुवारी : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. गौतमीचा  अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राडा झाला आहे. कार्यक्रम सुरू असताना काही हुल्लडबाजांनी गोंधळ घातला, त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांचा लाठीचार्ज सुरू झाल्यानंतर कार्यक्रमस्थळी प्रेक्षकांची चांगलीच धावपळ उडाली. या प्रकारानंतर मोठ्या पोलीस बंदोबस्तात गौतमीला कार्यक्रमस्थळावरून बाहेर काढण्यात आले.

हुल्लडबाजांकडून गोंधळ  

गौतमीचा राहात येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र कार्यक्रम सुरू असताना अचानक काही हुल्लडबाजांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या हुल्लडबाजांना आवरण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. गौतमीचा डान्स सुरू असताना काही प्रेक्षकांकडून पैशांची उधण करण्यात आली, यावरूनच हा गोंधळ सुरू झाला. या गोंधळामुळे गौतमीने डान्स थांबवला. डान्स थांबवण्यामुळे गोंधळ आणखी वाढला. प्रेक्षकांनी कार्यक्रमस्थळी राडा घालण्यास सुरुवात केली.

पुण्याला येत असताना भरधाव कारचा भीषण अपघात; माय-लेकराने जागीच सोडला जीव

पोलिसांचा लाठीचार्ज 

शांत राहण्याचं आवाहन करूनही प्रेक्षक ऐकत नसल्यानं अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर प्रेक्षकांची चांगलीच धावपळ उडली. कार्यक्रमस्थळी 60 बाऊन्सर असताना देखील प्रेक्षकांना आवरताना आयोजकांची चांगलीच दमछाक झाली. या राड्यानंतर कार्यक्रम आटोपता घेण्यात आला. गौतमीला मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये कार्यक्रम स्थळावरून बाहेर काढण्यात आलं.

First published:
top videos

    Tags: Ahmednagar, Ahmednagar News, Gautami Patil, Police