पुणे, 01 फेब्रुवारी : देशाच्या उत्तरेत मागच्या काही दिवसांपासून हिमवृष्टी होत असल्याने उत्तरेतील राज्यात थंडीची लाट कायम आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात ढगाळ वातावरणामुळे थंडीची लाट कमी झाली होती. परंतु पुढच्या दोन दिवसांत पुन्हा थंडीची लाट येणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. पुढच्या 48 तासांत याची तिव्रता दिसणार असल्याचे सांगण्यात आले आहे. किमान पारा 2 ते 4 अंशांनी खाली घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जम्मू-कश्मीर आणि लडाखमध्ये मोठा हिमवर्षाव झाल्याने त्याचा परिणाम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत दिसण्याची शक्यता आहे. पुढच्या दिवसांत राज्यातील बहुतांश शहरांच्या किमान तापमानात 2 ते 4 अंशांनी घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये मंगळवारी मोठा हिमवर्षाव झाल्याने त्या भागातील तापमान उणे 8.1 अंशांपर्यंत खाली गेले आहे.
हे ही वाचा : पुण्यासह, मराठवाड्यात पाऊस धुमाकूळ घालणार, मुंबईत असा आहे अंदाज
जम्मूमधील संपूर्ण गुलमर्ग शहर बर्फाच्छादित झाले आहे. तेथे लोक घरात अडकून पडले आहेत, तर लडाखचे तापमान उणे 14.1 अंशांवर गेले असून, तेथेही मोठा हिमवर्षाव सुरू आहे. याचा प्रभाव राजस्थानवरही झाला असून, तेथे काही भागांत पारा 5 अंशांवर खाली आला आहे. या वातावरणामुळे उत्तर भारतातून थंड वारे महाराष्ट्रात आगामी 48 तासांत येत आहे. दोन दिवसांत राज्यातील पारा घसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
राज्यात या भागात थंडी वाढणार
पुणे, मध्य महाराष्ट्रातही थंडीचा जोर वाढणार आहे. मुंबईत किमान तापमान सरासरीपेक्षा कमी होण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. गुजरातमार्गे येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पालघर, उत्तर मुंबई आणि ठाण्यावर अधिक परिणाम जाणवणार आहे. 30 जानेवारीपासून तापमानात लक्षणीय घट होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली.
हे ही वाचा : अवकाळी पावसाने कांदा; केळी महाग होण्याची शक्यता, शेतीचे मोठे नुकसान
राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर भारतात अद्यापही थंडीचा कडाका कायम आहे. राज्यातील इतर भागात थंडीचा जोर 26 जानेवारीपर्यंत कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र, नवीन अंदाजानुसार आता पुन्हा राज्यात थंडी वाढण्याची शक्य
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Vidarbha, Weather Forecast, Weather Update, Weather Warnings, Winter, Winter session