जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Dhule Cold Temperature : राज्यात थंडीचा कडाका वाढला, धुळे धुक्यात बुडाले, तुमच्या शहराचं काय तापमान?

Dhule Cold Temperature : राज्यात थंडीचा कडाका वाढला, धुळे धुक्यात बुडाले, तुमच्या शहराचं काय तापमान?

Dhule Cold Temperature : राज्यात थंडीचा कडाका वाढला, धुळे धुक्यात बुडाले, तुमच्या शहराचं काय तापमान?

राज्यातील बऱ्याच ठिकाणी मागच्या दोन दिवसांपासून कडाक्याची थंडी तर दुपारी उन्हाचा चटका बसत असल्याचे दिसून येत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 10 डिसेंबर : राज्यातील बऱ्याच ठिकाणी मागच्या दोन दिवसांपासून कडाक्याची थंडी तर दुपारी उन्हाचा चटका बसत असल्याचे  दिसून येत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील तीन दिवस राज्यात 2 ते 3 अंशांनी किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान नाशिक, धुळे परिसरात जोरदार थंडी पडल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. धुळ्याचा पारा 5.5 अंशावर आल्याने नागरिकांना कामे करण्यात अडथळे येत आहेत.

जाहिरात

राज्यात पुणे, सातारा, नाशिकसह राज्यभर थंडीचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमान कमालीची घट झाली आहे. महाबळेश्वरमध्ये तापमानात मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. तर धुळ्याच्या वेण्णालेक परिसरात  5 अंशांची नोंद झाली आहे. धुळ्यातही तापमानात कमालीची घट झाली आहे. मेंडोस चक्रीवादळामुळे कोकणातील काही भाग सोडता राज्यातील इतर भागात थंडीची चाहुल पुन्हा लागली आहे.

हे ही वाचा :  जायकवाडीला दरवर्षी येणारे विदेशी पाहुणे कुठे हरवले? पाहा Video

कोल्हापूर जिल्ह्यात थंडीची चाहूल लागण्यास सुरूवात झाली आहे. धुळ्यात तापमान 5.5 अंशांवर गेल्याने नागरिकांना चांगलीच हुडहुड भरली आहे. नाशिकमध्येही हुडहुडी भरण्यासारखी थंडी पडत असल्याचे दिसून येत आहे. तर पुण्यातही थंडीची चाहुल लागल्याने पुणेकरांचे स्वेटर्स, कानटोप्या कपाटातून बाहेर निघाल्या आहेत. रब्बी पिकांना पोषक थंडी पडल्यानं शेतकरी आनंदला आहे. धुळे जिल्ह्यात अचानक गारवा निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. हुडहुडी भरणारी थंडी असल्याने लोकांची कामे खोळांबली आहेत.

जाहिरात

नाशिकचा पारा घसरला

अनेक दिवस रेंगाळलेल्या पावसानंतर नशिकमध्ये थंडीचे आगमन झालंय. गेल्या काही दिवसांपासून पारा सातत्याने खाली उतरतोय नाशिकचे तपामन तीन दिवसांत 13 सेल्सिअसवर अंशापर्यंत खाली घसरले आहे. तर निफाडमध्ये 10 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. यामुळे व्यायाम शाळा जिम, जॉगिंग ट्रॅक हळूहळू गर्दीने फुलून जात असताना गोदा काठावर मात्र सकाळी रेलचेल कमी दिसत आहे.  

जाहिरात

हे ही वाचा :  OMG! जगातील सर्वात महाग अननस; किंमत इतकी की याच्यासमोर सोनंही स्वस्त

मंदिरांच्या अवती भवती पांढऱ्या शुभ्र धुक्याची चादर, त्या अडून गोदावरीच्या पाण्यात डोकावणारी सूर्य किरण, त्यामुळे गोदेच्या पाण्याला जणू सोन्याचा मुलामा दिला आहे की काय असा भास होत आहे. पर्यटकही या थंडीचा आनंद घेत आहेत. एखाद्या चित्रकाराने आपल्या कल्पनेतील चित्र रेखाटावे असे दृश्य सध्या गोदा काठावर दिसत आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात