औरंगाबाद, 8 नोव्हेंबर : औरंगाबाद जिल्ह्याची वेगळी ओळख म्हणजे पैठण तालुक्यामध्ये असणारे जायकवाडी हे धरण आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणामध्ये दरवर्षी ऑक्टोबर महिन्यापासूनच स्लोमिंग सह इतर वेगवेगळे विदेशी पक्षी येत असतात. मात्र, हवामान बदलामुळे जायकवाडी धरणात येणाऱ्या विदेशी पक्ष्यांचे आगमन लांबले आहे. त्यामुळे आता विदेशी पक्ष्यांचे आगमन कधी होणार याकडे पक्षी प्रेमींचं लक्ष लागले आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये मानव दिवसेंदिवस प्रगती करत आहे. माणूस ज्या वेगाने प्रगती करत आहे त्याच वेगाने निसर्गाची हानी देखील होत आहे. ज्या ठिकाणी मानवाला आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास करायचा असेल त्या ठिकाणची नैसर्गिक संपत्ती नष्ट केली जाते. यामध्ये सर्वाधिक झाडे तोडण्यात येतात. दिवसेंदिवस होणारी ही वृक्षतोड निसर्गात बदल घडवून आणते. यामुळे नेहमीच्या वेळी पडणारी थंडी उशिरा पडायला लागली. यावर्षी थंडी सुरुवातीला पडलीच नाही. ऋतुचक्रात बदल झाल्याने पक्ष्यांचे आगमन लांबले आहे, अशी माहिती पक्षी अभ्यासक डॉ. दिलीप यार्दी यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांनो, उंदराच्या भीतीनं 'ही' चूक कधीही करू नका, उत्पादनावर होईल परिणाम! Video
कोणते पक्षी येतात?
जायकवाडी धरणामध्ये येणारे पक्षी हे प्रामुख्याने हिमालय पर्वत, अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, मंगोलिया, सायबेरिया तिबेट रशिया इत्यादी भागातून येतात. यात थंडीच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये येणारे पक्षी तुतवार, नदी सुरय, समुद्र पक्षी, मत्सय गरुड विविध धोबी पक्षी यांचा समावेश असतो. तर दुसऱ्या टप्प्यांमध्ये म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये येणारे पक्षी म्हणजे नकटा बदक, शेंदया बड्डा, कानुक चक्रवाक पट्टकदबसरग्य बटवा, ससाणे, मत्स गरुड,शिक्रा, भिवत्या, मधुबाज मोहाळ्या तर डिसेंबर महिन्यात रोहित, बार हेडेडगूज, कलहांस, चक्रवाक, चिखल बड्ड, श्वेतबलाक इत्यादी पक्षांचं समावेश असतो, असंही दिलीप यार्दी यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Aurangabad News, Local18