Home /News /maharashtra /

आमदार, खासदारांनी सोडली साथ; शिवसेना वाचवण्यासाठी आता नगरसेवक सरसावले, काय आहे प्लॅन?

आमदार, खासदारांनी सोडली साथ; शिवसेना वाचवण्यासाठी आता नगरसेवक सरसावले, काय आहे प्लॅन?

आमदार आणि खासदारांनी साथ सोडल्यानंतर नाशिकचे नगरसेवक मात्र उद्धव ठाकरेंची भेट घेत आपण सोबत असल्याचं सांगणार आहेत.

नाशिक 24 जुलै : गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडल्या. यात सर्वाधिक धक्के शिवसेनेला बसले. शिवसेनेतील आमदारांच्या बंडानंतर महाविकास आघाडीचं सरकार आणि उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं. मात्र, एवढ्यावरच हे सगळं थांबलं नाही, तर नंतर १२ खासदारांनीही वेगळा गट स्थापन करण्यासाठी पाऊले उचलली. या सगळ्या घटनांदरम्यान शिवसेनेतील ही गळती रोखण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून सध्या प्रयत्न सुरू आहेत. मग ठरवलं मंत्रिपद गेलं खड्ड्यात; ठाकरेंवर टीका करणार नसल्याचं सांगणाऱ्या गुलाबरावांची जाहीर नाराजी! आदित्य ठाकरे अनेक जिल्ह्यांमध्ये जात शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. तर आता आमदार आणि खासदारांनी साथ सोडल्यानंतर नाशिकचे नगरसेवक मात्र उद्धव ठाकरेंची भेट घेत आपण सोबत असल्याचं सांगणार आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये नगरसेवकही एकनाथ शिंदेंना समर्थन देताना दिसत आहेत. मात्र नाशिकचे सर्व नगरसेवक आज मातोश्रीवर जाणार आहेत. सकाळी 11 वाजता ते उद्धव ठाकरे यांची भेट घेतील. राज्यभरात शिवसेनेत पडझड होत असताना नाशिकचे शिवसैनिक सोबत असल्याचा विश्वास ते उद्धव ठाकरे यांना देणार आहेत. शिवसेनेचे जवळपास 34 नगरसेवक आणि कोर कमिटी पदाधिकारी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. रोहीत पवारांचे सरकारविषयी भाकीत, चंद्रकांत पाटलांच्या विधानामुंळे चर्चेला उधाण TOP बातम्या नाशिक जिल्ह्यातून दोन आमदार आणि एक खासदार सध्या शिंदे गटात दाखल झालेले आहेत. मात्र नगरसेवक शिवसेनेसोबत असल्याचा विश्वास हे सर्व आज उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन देणार आहेत.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Shivsena, Uddhav thackeray

पुढील बातम्या