जळगाव, 23 जुलै : शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी यापूर्वीही अनेकदा सांगितलं आहे की, काहीही झालं तर उद्धव ठाकरेंवर टीका करणार नाही. हिच भावना शिवसेना फोडून आलेल्या आमदारांनी वारंवार व्यक्त केली. शेवटी गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. गुलाबराव पाटलांची जाहीर नाराजी! यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले, शेवटी नेत्याने पण कार्यकर्त्यांचं ऐकलं पाहिजे. पण उद्धव ठाकरेंनी आमचं ऐकून घेतलं नाही. उद्धव ठाकरेंवर टीका करणार नाही, असं सांगणारे शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंवर जाहीर टीका केली. माझा व्यक्तिगत प्रश्न नव्हता, पण पहिल्यांदा आमदार झालेल्यांची अडचण होती, म्हणून आमदारांनी उठाव केला, असंही ते यावेळी म्हणाले. संजय राऊत यांनी हलकटासारखं निघून जा असं सांगितलं, मग ठरवलं मंत्रिपद गेलं खड्ड्यात, असं म्हणत गुलाबराव पाटलांनी आपला राग व्यर्त केला. दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रभरात संवादयात्रा काढली आहे. यावेळी ते राज्यातील शिवसैनिकांची भेट घेत आहेत. या ठिकाणी गेल्यावर गेल्यावर शिवसेना फोडून बाहेर पडलेल्या ५० आमदारांना ते गद्दार असं संबोधत आहे. यापूर्वीही आदित्य यांनी शिवसेना फोडून गेलेल्या बंडखोर आमदारांना पदाचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडणुकीस उभं राहावं असं आव्हान दिलं आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला आणि ते गद्दार आहेत, अशी टीका करीत आहेत. त्यावर अनेकदा बंडखोर आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही गद्दार नाही तर आम्ही उठाव केला, अशा शब्दात आपली भावना व्यक्त करतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.