नांदेड, 6 जानेवारी : नांदेड शहरातील शारदा नगर (Sharda Nagar Nanded) भागात एका दुचाकीस्वाराचा पाठलाग करुन त्याची निर्घृण हत्या (murder) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. भररस्त्यात घडलेली ही थरारक घटना सीसीटीव्हीत कैद (Caught in CCTV) झाली आहे. एका युवकाला अडवून तीन दुचाकीस्वारांनी तीक्ष्ण हत्याराने त्याच्यावर सपासप वार केले आणि निर्घृण हत्या केली. (22 year old youth brutally murdered in Sharda nagar area of nanded, caught in CCTV) शारदानगर भागात बुधवारी (5 जानेवारी) सायंकाळी ही घटना घडली. 22 वर्षीय रमेश धुमाळ हा दुचाकीवरून जात असतांना त्याला पाठीमागून दुसऱ्या दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी अडवलं. त्यानंतर आरोपींनी अचानक रमेश धुमाळ याच्यावर हल्ला केला. यावेळी आपले प्राण वाचवण्यासाठी रमेश तेथून पळू लागला. पण हल्लेखोरांनी त्याला पकडून धारदार शस्त्राने त्याला भोसकले. लाच घेताना मुंबईतील क्लास वन अधिकारी ACBच्या जाळ्यात, घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड या हल्ल्यात रमेश धुमाळ हा मृत्यूमुखी पडला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. रमेश धुमाळ याची हत्या नेमकी का आणि कशासाठी केली याचाही पोलीस तपास करत आहेत. भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना घडली तेव्हा शेजारी काही नागरिक उपस्थित असल्यातंही दिसत आहे. मात्र, कुणीही रमेश याच्या मदतीला धावून आलं नाही. सर्वचजण केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे. या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पिंपरीत अल्पवयीन मुलांकडून सिनेस्टाईल हत्या गेल्या काही दिवसांत पिंपरी चिंचवड परिसरात गुन्हेगारीच्या घटनांत प्रचंड वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी काही तरुणांनी एका व्यवसायिकाला भरचौकात गोळ्या घालून निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर आता किरकोळ कारणातून दोन अल्पवयीन मुलांनी एका दुचाकीस्वाराची सिनेस्टाईल हत्या केली आहे. आरोपींनी मृत व्यक्तीला रस्त्यावर ओढत आणून भयावह पद्धतीने हत्या केली आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. सुनील सगर असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर चिखली पोलिसांनी 14 आणि 17 वर्षीय अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणातून मृत सुनील आणि अल्पवयीन मुलांमध्ये बाचाबाची सुरू झाली. यानंतर सुनीलने दोन अल्पवयीन मुलांपैकी एकाच्या कानशिलात लगावली. या प्रकारानंतर सुनील आणि दोन्ही अल्पवयीन मुलांमध्ये बाचाबाची वाढत गेली. यामुळे सुनील हे जीव वाचवण्यासाठी घटनास्थळावरून पळून गेले आणि एका किरणा दुकानात जाऊन थांबले. पण पाठलाग करणाऱ्या आरोपींनी त्यांना धक्काबुक्की करत दुकानातून बाहेर काढलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







