मुंबई, 6 जानेवारी : महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षणाचे सहसंचालक अनिल जाधव (Maharashtra State Skill Development Society Joint Director Anil Jadhav) यांना एसीबीने (Anti Corruption Bureau) लाच घेताना अटक केली आहे. त्यानंतर एसीबीने त्यांच्या घराची झाडाझडती घेतली असता कोट्यवधी रुपयांची संपत्ती आढळून आली आहे. अनिल जाधव यांच्या घरातून कोट्यवधी रुपयांचे दागिने आणि रोकड जप्त करण्यात आली आहे. अनिल जाधव यांना मंगळवारी पाच लाख रुपयांची लाच घेताना मुंबईतील वांद्रे येथील कार्यालयातून अटक करण्यात आली होती. (ACB arrest MSSDS joint director accepting bribe) त्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी अनिल जाधव यांच्या घराची झाडाझडती घेतली असता त्यांच्या घरुन कोट्यवधी रुपयांचं घबाड सापडलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एसीबीने अनिल जाधव यांच्या घरातून 1 कोटी 61 लाख 38 हजारांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये 81 लाख रुपयांची रोकडचा समावेश आहे. तर इतर वस्तूंमध्ये सोन्याची नाणी, सोन्याची बिस्किटे आणि दागदागिन्यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे एका शैक्षणिक अकॅडमीत भागीदार आहेत. आपल्या अकॅडमीत विविध कोर्सच्या मंजुरीसाठी त्यांनी शिक्षण व प्रादेशिक विभागाकडे अर्ज केला होता. यावेळी या मंजुरीसाठी अनिल जाधव यांनी त्यांच्याकडे पाच लाखांची लाच मागितली होती. वाचा : पुण्यात कोरोनाचं थैमान असताना हॉटेल्समध्ये धांगडधिंगा, 4 मोठ्या हॉटेलवर कारवाई त्यानंतर संबंधित इसमाने या संदर्भात एसीबीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर मंगळवारी ही रक्कम देण्याचं ठरलं आणि जेव्हा अनिल जाधव हे 5 लाखांची लाच घेत होते त्यावेळी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी एसीबी अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले. 7 डिसेंबर रोजी संबंधित इसमाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अनिल जाधव यांच्या संबंधित तक्रार केली होती. या तक्रारीची एसीबीच्या अधिकाऱ्यांनी खातरजमा केली आणि त्यानंतर मंगळवारी (4 जानेवारी 2022) रोजी अनिल जाधव यांना लाच घेताना रंगेहात अटक केले. महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षणाचे सहसंचालक अनिल जाधव यांना अटक करण्यात आल्यावर त्यांच्या घराची झाडाझडती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी घेतली. यावेळी त्यांच्या घरातून सोन्याची नाणे, सोन्याचे बिस्किट आणि इतर दागिने असे एकूण एक किलो 572 ग्रॅम सोने आढळून आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







