मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Deglur assembly by polls: 'पैसा घ्या भाजपचा पण मत द्या महाविकास आघाडीला' जाहीर सभेत राष्ट्रवादीच्या नेत्याचा मतदारांना सल्ला

Deglur assembly by polls: 'पैसा घ्या भाजपचा पण मत द्या महाविकास आघाडीला' जाहीर सभेत राष्ट्रवादीच्या नेत्याचा मतदारांना सल्ला

'पैसा घ्या भाजपचा पण मत द्या महाविकास आघाडीला' जाहीर सभेत राष्ट्रवादीच्या नेत्याचा मतदारांना सल्ला

'पैसा घ्या भाजपचा पण मत द्या महाविकास आघाडीला' जाहीर सभेत राष्ट्रवादीच्या नेत्याचा मतदारांना सल्ला

Deglur biloli assembly by polls: नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा मतदारांना वादग्रस्त सल्ला.

नांदेड, 28 ऑक्टोबर : नांदेड (Nanded) जिल्ह्यातील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Deglur Biloli by polls) आयोजित करण्यात आलेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याने (NCP) एक वादग्रस्त सल्ला दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मतदारांना सल्ला देत म्हटलं, जर पैसा तुमच्याकडे कुणी घेऊन आलं तर नक्की घ्या पण मतदान मात्र, महाविकास आघाडीलाच करा. जाहीर सभेत अमोल मिटकरी यांनी हे वक्तव्य केलं आहे. देगलूर विधानसभेसाठी 30 ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार आहे. तर 3 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी

अमोल मिटकरी म्हणाले, "पंढरपूरमध्ये जी चूक मतदार राजाकडून घडली... माझी इथल्या मतदारांना विनंती आहे, ही चूक इथे घडू देऊ नका. तुमचं मत मीठ मिरची एवढे स्वस्त समजून या दलालांपुढे गहाण ठेवू नका. त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे. त्यांचे एक-एक कार्यालय 30 हजार कोटींचे आहे. आता दिवाळी आहे, पैसा आलाच तर लक्ष्मीला नाही म्हणू नका. फटाके घ्या, चिवडा, चकल्या, बायकोला साडी आणि लेकरांना कपडे घ्या. पैसा घ्यायचा भाजपचा पण शिक्का मारायचा पंजावर".

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत कोण मारणार बाजी?

नांदेड जिल्ह्यातील देगलूर - बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Deglur Assembly bypolls) 30 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर 3 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त होती. आता या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. भाजपने शिवसेनेच्या सुभाष साबणे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. नांदेड हा अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे या निवडणुकीत अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर ही जागा मिळवण्यासाठी भाजपनेही कंबर कसली आहे.

वाचा : भाजपला मोठा झटका ! लातूर जिल्हा बँक निवडणुकीत सर्व उमेदवारांचे अर्ज बाद

सुभाष साबणे यांचा अल्प परिचय

सुभाष साबणे हे शिवसेनेचे नेते. त्यांनी आतापर्यंत तीन वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. सुभाष साबणे हे मुखेड विधानसभा मतदारसंघातील आमदार होते. त्यानंतर त्यांनी देगलूर येथून विधानसभा निवडणूक जिंकली. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या रावसाहेब अंतापूरकर यांनी सुभाष साबणे यांना पराभूत केलं.

काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त होती. आता या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. काँग्रेसने ही जागा पुन्हा मिळवण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. तर तिकडे विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सुद्धा या जागेवर विजय मिळवण्यासाठी आपली पूर्ण तयारी केली आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मविआ सरकारला झटका दिल्यानंतर आता देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पुन्हा भाजप बाजी मारतं की काँग्रेस आपली जागा राखतं हे पाहवं लागेल.

देगलूर बिलोली मतदारसंघात कोणाचं प्राबल्य?

2009 च्या निवडणुकीत काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर विजयी

2014 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या सुभाष साबणे यांनी मारली बाजी

2019 मध्ये पुन्हा रावसाहेब अंतापूरकर यांनी विजय मिळवला

First published:
top videos

    Tags: BJP, Nanded, NCP, महाराष्ट्र