मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भाजपला मोठा झटका ! लातूर जिल्हा बँक निवडणुकीत सर्व उमेदवारांचे अर्ज बाद

भाजपला मोठा झटका ! लातूर जिल्हा बँक निवडणुकीत सर्व उमेदवारांचे अर्ज बाद

Big jolt to bjp in Latur: भारतीय जनता पक्षाला एक मोठा झटका बसला आहे. लातूर जिल्हा बँक निवडणुकीत सर्व उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत.

Big jolt to bjp in Latur: भारतीय जनता पक्षाला एक मोठा झटका बसला आहे. लातूर जिल्हा बँक निवडणुकीत सर्व उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत.

Big jolt to bjp in Latur: भारतीय जनता पक्षाला एक मोठा झटका बसला आहे. लातूर जिल्हा बँक निवडणुकीत सर्व उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत.

  • Published by:  Sunil Desale

लातूर, 23 ऑक्टोबर : भारतीय जनता पक्षाला (BJP) जिल्हा बँक निवडणुकीत एक मोठा झटका बसला आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत (latur district central co operative bank election) भाजपच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. यामुळे निवडणुकीपूर्वीच भाजपचे उमेदवार पराभूत झाले आहेत. भाजप उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने काँग्रेसला (Congress) याचा मोठा फायदा होणार असल्याचं स्पष्ट आहे.

लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होत आहे. 19 जागांसाठी ही निवडणूक होणार असून त्यासाठी काँग्रेस, भाजप, अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, भाजपच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचे अर्ज हे बाद झाले आहेत. अर्जांची छाननी करत असताना त्यात असलेल्या त्रृटींमुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचे सर्व अर्ज बाद केले. त्यामुळे भाजपला मोठा झटका बसला आहे.

अर्ज बाद झाल्याने भाजपचा आरोप

जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून आमचे अर्ज बाद कऱण्याचे षडयंत्र रचण्यात आले आहे. सत्ताधाऱ्यांनी भाजपच्या सर्व उमेदवारांचे अर्ज बाद करून लोकशाहीचा खून केला आहे. या प्रकरणी आम्ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे तक्रार करणार आहोत. तसेच सरकारी यंत्रणेच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची मागणीही भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांनी पुढे म्हटलं, या संदर्भात आम्ही तक्रारीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे संपर्क केला असता ते फोन घेण्यास तयार नव्हते. या प्रकरणी आम्ही न्यायालयात धाव घेणार आहोत. हा एक षडयंत्राचा भाग आहे आणि या षडयंत्रात जो कुणी सहभागी आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत कोण मारणार बाजी?

नांदेड जिल्ह्यातील देगलूर - बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Deglur Assembly bypolls) 30 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर 3 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त होती. आता या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. भाजपने शिवसेनेच्या सुभाष साबणे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. नांदेड हा अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे या निवडणुकीत अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर ही जागा मिळवण्यासाठी भाजपनेही कंबर कसली आहे.

सुभाष साबणे यांचा अल्प परिचय

सुभाष साबणे हे शिवसेनेचे नेते. त्यांनी आतापर्यंत तीन वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. सुभाष साबणे हे मुखेड विधानसभा मतदारसंघातील आमदार होते. त्यानंतर त्यांनी देगलूर येथून विधानसभा निवडणूक जिंकली. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या रावसाहेब अंतापूरकर यांनी सुभाष साबणे यांना पराभूत केलं.

काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त होती. आता या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. काँग्रेसने ही जागा पुन्हा मिळवण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. तर तिकडे विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सुद्धा या जागेवर विजय मिळवण्यासाठी आपली पूर्ण तयारी केली आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मविआ सरकारला झटका दिल्यानंतर आता देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पुन्हा भाजप बाजी मारतं की काँग्रेस आपली जागा राखतं हे पाहवं लागेल.

देगलूर बिलोली मतदारसंघात कोणाचं प्राबल्य?

2009 च्या निवडणुकीत काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर विजयी

2014 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या सुभाष साबणे यांनी मारली बाजी

2019 मध्ये पुन्हा रावसाहेब अंतापूरकर यांनी विजय मिळवला

First published:

Tags: BJP, Election, Latur, काँग्रेस