मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Deglur Assembly by polls: भाजपकडून सुभाष साबणे यांना उमेदवारी, शिवसेनेला मोठा झटका

Deglur Assembly by polls: भाजपकडून सुभाष साबणे यांना उमेदवारी, शिवसेनेला मोठा झटका

Deglur Assembly bypolls: नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे.

Deglur Assembly bypolls: नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे.

Deglur Assembly bypolls: नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे.

तुषार रूपनवर, प्रतिनिधी

नांदेड, 3 ऑक्टोबर : नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Deglur Assembly by polls) भारतीय जनता पक्षाकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. भाजपने शिवसेनेच्या सुभाष साबणे (BJP announced Subhash Sabane candidate for by polls) यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. सुभाष साबणे हे माजी आमदार असून त्यांनी या मतदारसंघातून रावसाहेब अंतापूरकर (Raosaheb Antapurkar) यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. देगलूर विधानसभेसाठी 30 ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार आहे. तर 3 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस श्रावण पाटील यांच्या घरी सुभाष साबणे पोहोचले आणि त्यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांची त्यांनी भेट घेतली. या भेटीनंतर देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुभाष साबणे हे भाजपचे अधिकृत उमेदवार असल्याचं जाहीर करण्यात आलं.

सुभाष साबणे यांचा अल्प परिचय

सुभाष साबणे हे शिवसेनेचे नेते. त्यांनी आतापर्यंत तीन वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. सुभाष साबणे हे मुखेड विधानसभा मतदारसंघातील आमदार होते. त्यानंतर त्यांनी देगलूर येथून विधानसभा निवडणूक जिंकली. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या रावसाहेब अंतापूरकर यांनी सुभाष साबणे यांना पराभूत केलं.

काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त होती. आता या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. काँग्रेसने ही जागा पुन्हा मिळवण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. तर तिकडे विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सुद्धा या जागेवर विजय मिळवण्यासाठी आपली पूर्ण तयारी केली आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मविआ सरकारला झटका दिल्यानंतर आता देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पुन्हा भाजप बाजी मारतं की काँग्रेस आपली जागा राखतं हे पाहवं लागेल.

देगलूर बिलोली मतदारसंघात कोणाचं प्राबल्य?

2009 च्या निवडणुकीत काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर विजयी

2014 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या सुभाष साबणे यांनी मारली बाजी

2019 मध्ये पुन्हा रावसाहेब अंतापूरकर यांनी विजय मिळवला

नांदेड हा अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे या निवडणुकीत अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर ही जागा मिळवण्यासाठी भाजपनेही कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडचा दौरा करत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

जिल्हा परिषद, पोट निवडणुकांचा कार्यक्रम

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात वातावरण तापलं आहे. या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर पुढील महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समीतीच्या निवडणुका पार पडणार आहेत. 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान घेण्यात येणार आहे, अशी घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. तसंच पालघर जिल्हा परिषदेच्या व त्या अंतर्गतच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी देखील त्याच दिवशी मतदान होईल आणि सर्व ठिकाणी 6 ऑक्टोबर 2021 रोजी मतमोजणी होणार आहे.

असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम

5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान; तर 6 ऑक्टोबर 2021 रोजी मतमोजणी होईल. जिल्हा परिषदेच्या एकूण 85 निवडणूक विभाग आणि पंचायत समितीच्या एकूण 144 निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होईल.

First published:
top videos