जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Valentine Week : जोडीदार निवडण्यासाठी Dating App वापरताय? 'ही' घ्या काळजी, Video

Valentine Week : जोडीदार निवडण्यासाठी Dating App वापरताय? 'ही' घ्या काळजी, Video

Valentine Week : जोडीदार निवडण्यासाठी Dating App वापरताय? 'ही' घ्या काळजी, Video

Valentine Week 2023: जोडीदार शोधण्यासाठी वेगवेगळ्या डेटिंग ॲप्सची आता वाढ झालीय. नागपूरमध्येही याची लोकप्रियता वाढली आहे.

  • -MIN READ Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

    विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 10 फेब्रुवारी : व्हॅलेंटाईन विकच्या निमित्तानं सध्या तरुणाईच्या उत्साहाला उधाण आलं आहे. काळानुरूप प्रेम व्यक्त करण्याचे माध्यमे बदलली तशा त्यातील पद्धती देखील बदलल्या आहेत. हल्लीच्या डिजिटल युगात अनेक समाज माध्यमांवरून प्रेम व्यक्त करणे तसेच सहज शक्य आहे. तरुण मुलं सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. आपला जोडीदार शोधण्यासाठी वेगवेगळ्या डेटिंग ॲप्सची आता वाढ झालीय. यापूर्वी देशातील निवडक महानगरांपुरते मर्यादित असलेले हे ॲप्सचा अन्य शहरांमध्येही विस्तार होत आहे. नागपूरमध्येही या ॲपची लोकप्रियता वाढत आहे. नागपूरमध्ये लागली पोस्टर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टेस्ट मॅचमुळे सध्या नागपूरकडं सर्वांचं लक्ष आहे. ही टेस्ट मॅच सुरू होण्यापूर्वी नागपूरमध्ये काही पोस्टर्सची चर्चा होती. या पोस्टरवर भारत-न्यूझीलँड मॅच दरम्यान पोस्टर हातात घेऊन टिंडरला “शुभमनसे मॅच करा दो” अशी विनंती करणाऱ्या मुलीचा फोटो आहे. Live-in Relationship बाबत A to Z माहिती, सर्व प्रश्नांची मिळतील उत्तरं! पाहा Video या फोटोचा टिंडरने आपल्या जाहिरातीसाठी वापर केला. त्यानंतर टीम इंडियाचा नागपूरकर क्रिकेटपटू उमेश यादवनंही हा फोटो ट्विट करत शुभमनला ट्रोल केलं.

    जाहिरात

    काय खबरदारी घ्याल? व्हॅलेंटाईन विकच्या निमित्तानं अनेक जण पार्टनर निवडत असतात. सध्याच्या डिजिटल युगात  डेटिंग ॲप हा नवा पर्याय तरुणाईला मिळाला आहे. माझ्या संपर्कातील अनेकांनी या ॲपच्या माध्यमांतून आपला सहकारी निवडला आहे. या ॲपचा वापर करताना सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. धर्माच्या भिंती तोडून केलं लग्न, पाहा कसा सुरू आहे नाशिकच्या आसिफ-रसिकाचा संसार, Video ऑनलाइन जग हे आभासी जग आहे.ऑनलाईन डेटिंग ॲप असल्याने त्याचे काही फायदे तोटे देखील असू शकतात. त्यामुळे आपण योग्यती खबरदारी आणि काळजी घेतली तर कुठलाही काळजीचं कारण राहणार नाही, असं मत सोशल मीडिया तज्ज्ञ रुचिका आसटकर यांनी व्यक्त केलं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात