विठ्ठल भाडमुखे,प्रतिनिधी नाशिक, 10 फेब्रुवारी : प्रेम विवाहाला अनेकांच्या घरातून विरोध होतो. त्यातच जर प्रेम विवाह आंतरजातीय असेल तर जास्त विरोध होतो. नाशिक च्या रसिका आडगावकर आणि आसिफ खान यांचा प्रेम विवाह हा आंतरजातीय असल्यामुळे चांगलाच विरोध झाला होता. निस्वार्थ प्रेम पाहून घरच्यांनी त्यांचं लग्न लावून देण्याचं ठरलवलं होतं. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या लग्नपत्रिकेनंतर निर्माण झालेला वाद. हा सोहळा म्हणजे लव्ह जिहाद आहे असा रंग काही धार्मिक कट्टरवाद्यांनी दिला होता. परंतु, तो फोल ठरला. त्यानंतर गेल्या वर्षी आधी शुभमंगल सावधान आणि नंतर कबूल है म्हणत हा विवाह सोहळा पार पडला होता. त्यांचाच संसार आता कसा सुरु आहे जाणून घेऊया. कशी झाली प्रेमाची सुरुवात? हिंदू समाजाची रसिका आडगावकर आणि मुस्लिम समाजातील आसिफ खान यांची कॉलेजमध्ये ओळख झाली. हळूहळू त्या ओळखीचं मैत्रीत रूपांतर झालं आणि नंतर मैत्रीचं रूपांतर काही काळाने प्रेमात झालं. आमचं निस्वार्थ प्रेम पाहून घरच्यांनी आमचं लग्न लावून देण्याचं ठरवलं, असं असिफ खान सांगतो.
Love Story : असा जोडीदार हवा! ऑनलाईन स्कॅममध्ये अडकलेल्या नेहाला बाहेर काढणारा सौरभ, Video
जोरदार विरोध दोघांचा ही परिवार खूप आनंदात होता लग्नाची तयारी झाली. प्रथा परंपरेनुसार लग्नपत्रिका छापली जाते तसच चि.सौ.का रसिका आडगावकर आणि चि.आसिफ खान यांचा शुभविवाह अशीच पत्रिका या दोघांचीही छापली गेली आणि ती पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली. तेव्हाच खऱ्या अर्थाने या लग्न सोहळ्यात मिठाचा खडा पडला तो लव्हजिहादच्या नावाचा आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मोठा धार्मिक वादंग निर्माण झाला. अनेक धार्मिक संघटना यामध्ये समाविष्ट झाल्या त्यांनी ह्या लग्नाला विरोध केला आणि तिथूनच या दोघांचं लग्न होणार की नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. खरंतर आसिफ किंवा रसिका या दोघांच्याही घरच्यांचा या लग्नाला कुठलाही विरोध नव्हता. त्या दोन्ही कुटुंबांच्या संमतीनेच हे लग्न पार पडणार होतं. मात्र, बाहेरील लोकांच्या विरोधामुळे या लग्नामध्ये अनेक अडचणी आल्या लव्ह जिहादचा रंग चढल्याने स्थगित झाल्यावर अनेकांनी त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो फोल ठरला.
Love Story : जोडीदाराचे डोळे जाणार हे माहिती असूनही ‘त्यांनी’ केलं लग्न! Video
आज काय आहे परिस्थिती? यामध्ये कालांतराने आमदार बच्चू कडू यांची सुद्धा इंट्री झाली आणि तिथून पुढे महीला व बालकल्याण विभाग असेल अंनिस, राष्ट्र सेवा दल व छात्रभारतीचे किंवा इतर कायदेशीर आस्थापनांच्या आदेशाने या दोघांचाही लग्नसोहळा मोठया थाटामाटात पार पडला. आज आसिफ आणि रसिका यांच्या लग्नाला जवळपास दीड वर्षे पूर्ण झालंय. समाजाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी हा प्रेम विवाह केला आणि आज हे जोडपं सुखा समाधानाने संसार करत आहे.