वाशिम, 20 फेब्रुवारी, किशोर गोमाशे : समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. महामार्गावर आणखी एक भीषण अपघात घडला आहे. कारंजा ते दोनद दरम्यान हा अपघात घडला आहे. भरधाव ट्रक पुलावरून खाली कोसळला, त्यानंतर ट्रकने पेट घेतला. या अपघातामध्ये दोघांचा जळून मृत्यू झाला आहे. हा अपघात रात्री दोनच्या सुमारास घडला. हा ट्रक नाशिक जिल्ह्यातून कांदे भरून कोलकाताकडे निघाला होता. वाहनावरील ताबा सुटल्यानं अपघात घटनेबाबत अधिक माहिती अशी की, वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. कारंजा ते दोनददरम्यान असलेल्या पुलावरून हा ट्रक खाली कोसळला. त्यानंतर ट्रकने पेट घेतला. या घटनेत ट्रकचा चालक आणि त्याच्या साथीदाराचा होरपाळून मृत्यू झाला आहे. चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्यानं हा ट्रक पुलाखाली कोसळला. Bus accident : छ. संभाजीनगरात एसटी बसचा भीषण अपघात; 25 प्रवासी जखमी हा ट्रक नाशिक जिल्ह्यातून कांदे भरून कोलकाताच्या दिशेनं निघाला होता. मात्र वाशिम जिल्ह्याच्या हद्दतील कारंजा ते दोनद दरम्यान पुलावर चालकाचं भरधाव ट्रकवरील नियंत्रण सुटलं. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा ट्रक पलटी झाला, ट्रकनं अपघातानंतर पेट घेतल्यानं या घटनेत चालक आणि आणखील एकाचा मृत्यू झाला आहे. अद्याप मृतांची ओळख पटील नसून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.