जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Bus accident : छ. संभाजीनगरात एसटी बसचा भीषण अपघात; 25 प्रवासी जखमी

Bus accident : छ. संभाजीनगरात एसटी बसचा भीषण अपघात; 25 प्रवासी जखमी

ट्रक आणि एसटीचा भीषण अपघात

ट्रक आणि एसटीचा भीषण अपघात

ट्रक आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 25 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

  • -MIN READ Chhatrapati Sambhaji Nagar,Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
  • Last Updated :

छत्रपती संभाजीनगर, 20 जून : जिल्ह्यातून भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे. मालवाहू ट्रक आणि एसटी बसचा अपघात झाला. या अपघातामध्ये 25 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. अपघात घडल्यानंतर ट्रकचालक ट्रक घटनास्थळीच सोडून पसार झाला आहे. हा अपघात आडूळ परिसरात सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडला. जखमींना स्थानिकांच्या मदतीनं  छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली होती. सुमारे अर्धा किलोमीटर लांब वाहनाच्या रांगा लागल्याचं पहायला मिळालं. धडकेमुळे बसवरील नियंत्रण सुटलं घटनेबाबत अधिक माहिती अशी की, धुळे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर छत्रपती संभाजीनगरकडून एक मालवाहतूक करणारा ट्रक जात होता. या ट्रकला आडळू परिसरात बसने ओव्हरटेक केले. मात्र त्यानंतर या ट्रकने बसला मागून धडक दिली. मागून जोरदार धडक बसल्यानं चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस दुभाजकाला धडकली. अपघात होताच ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. Darshana Pawar : दर्शनाचा मृत्यू नेमका कसा झाला? पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून मोठा खुलासा, धक्कादायक माहिती समोर 25 जण जखमी या अपघातामध्ये बसमधील तब्बल 25 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पाचोड पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठी वाहतूककोंडी निर्माण झाली होती. पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: accident , ST , st bus
  • First Published :
जाहिरात
जाहिरात