जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मंत्रिमंडळ विस्तारात आठवलेंनाही हवंय मंत्रिपद; फडणवीसांकडे केली मोठी मागणी

मंत्रिमंडळ विस्तारात आठवलेंनाही हवंय मंत्रिपद; फडणवीसांकडे केली मोठी मागणी

रामदास आठवलेंकडून पक्षासाठी मंत्रिपदाची मागणी

रामदास आठवलेंकडून पक्षासाठी मंत्रिपदाची मागणी

राज्यात शिंदे, फडणवीस सरकार चांगले निर्णय घेत आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळात आरपीआयला संधी मिळावी अशी इच्छा रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.

  • -MIN READ Nagpur,Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

नागपूर, 6 जून, उदय तिमांडे : रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा शिर्डीमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मला संधी मिळाली तर मी शिर्डीमधून लोकसभा निवडणूक लढवणार असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. आमच्या राज्यात दोन जागा निवडून आल्या तर पक्षाला मान्यता मिळेल म्हणून मी अमित शाह यांच्यासोबत चर्चा करणार आहे. पक्षाला येत्या निवडणुकीत दोन ते तीन जागा कशा मिळतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. रामदास आठवले यांनी नेमकं काय म्हटलं?  मला संधी मिळाली तर मी शिर्डीमधून लोकसभा निवडणूक लढवणार आहे. जर आमच्या राज्यात दोन जागा निवडून आल्या तर आम्हाला मान्यता मिळणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत पक्षाला दोन ते तीन जागा देण्यात याव्यात यासाठी मी अमित शाह यांच्यासोबत चर्चा करणार आहे. पक्षाला येत्या निवडणुकीत दोन ते तीन जागा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करेल, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते. Political news : मोठी बातमी! नाशिकनंतर आता धाराशिवमध्येही युतीत बिघाडी; शिवसेनेनं भाजपला सुनावलं मंत्रिमंडळात संधी देण्याची मागणी  दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यात शिंदे, फडणवीस सरकार चांगले निर्णय घेत आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळात आरपीआयला संधी मिळावी अशी मागणी आपण फडणवीसांकडे केली आहे. त्यांनी यावर विचार करू असं सांगितलं. महामंडळात देखील पक्षाला संधी मिळाली पाहिजे. राज्यातील महायुती सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे. त्यामुळे 2024 मध्ये आम्हाला  चांगलं यश मिळेल. येणाऱ्या निवडणुकीत आम्ही युतीसोबतच असणार आहोत. आम्हाला चांगल्या जागा मिळाल्या पाहिजे असं आठवले यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात