नागपूर 11 सप्टेंबर : शुक्रवारी राज्यभरात जड अंतःकरणाने गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीतील अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याचं सोशल मीडियावर पाहायला मिळालं. मात्र, या उत्साहाच्या वातावरणात अनेक ठिकाणांहून धक्कादायक घटनाही समोर आल्या आहेत. अशीच एक घटना नागपुरमधूनही समोर आली आहे. पोलीस आणि कुटुंबीयांनी अडीच महिने घेतला बेपत्ता तरुणाचा शोध, अखेर घरातच सापडला पुरलेला मृतदेह विसर्जनाच्या मिरवणुकीत काहीतरी कारणांवरुन वाद झाल्याच्या तसंच विसर्जन करताना बुडून मृत्यू झाल्याच्या भरपूर घटना समोर आलेल्या आहेत. नागपुरातून समोर आलेल्या घटनेत गणपती विसर्जन मिरवणुकीत हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्येमागचं कारण कोणालाही थक्क करेल असं आहे. डीजे वाजवण्यावरुन झालेल्या वादामुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान डीजे वाजवण्यावरून हा वाद सुरू झाला होता. हा वाद इतका वाढला की आरोपींनी डीजे मालक कल्पेश बावनकुळे यांची हत्या केली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. शिक्षकाचं राक्षसी कृत्य; ‘या’ कारणामुळे 7 वर्षीय विद्यार्थ्याच्या अंगावर फेकलं उकळतं पाणी ही घटना नागपूर लगत असलेल्या कन्हान पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रात्री 12 वाजताच्या सुमारास घडली. यासंदर्भात कन्हान पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. याशिवाय राज्यभरातून गणपती विसर्जनादरम्यान बाप्पाचं विसर्जन करताना अनेकजण बुडाल्याच्या घटनाही समोर आलेल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.