रांची 11 सप्टेंबर : रांचीच्या पतरातू येथून नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात बहिणीने भावाची हत्या करून मृतदेह अंगणातच पुरला. तरुण बेपत्ता झाल्यानंतर सुमारे अडीच महिन्यांनी शनिवारी हा प्रकार उघडकीस आला. या हत्येत तरुणीच्या प्रियकराचा सहभाग असल्याची बाबही समोर येत आहे. रामगडचे एसपी पीयूष पांडे यांनी सांगितलं की, प्रथमदर्शनी हे हत्येचं प्रकरण आहे. तरुणीची चौकशी सुरू आहे. दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदन करण्यात येणार आहे. रोहित महतो (22 वर्षे) हा बरतुआ, पतरातू येथील रहिवासी असून तो 30 जून रोजी रांचीमधील चुटिया येथून बेपत्ता झाला होता. रोहितचे वडील नरेश महतो यांनी चुटिया पोलीस ठाण्यात बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी रोहितचा शोध सुरू केला असता मोबाईलचे शेवटचे लोकेशन पतरातू येथे मिळाले. इथे तपास केला असता, रोहितची मोठी बहीण चंचल रोड क्रमांक 33 मधील एफ-235 या क्वार्टरमध्ये एकटीच राहते, असं पोलिसांना समजलं. पोलिसांनी चंचलची चौकशी केली असता, तिने रोहितचा मृतदेह अंगणातच पुरला असल्याचं सांगितलं. नांदेड : जंगलात युवकाची दगडाने ठेचून हत्या; मृतदेहाशेजारी सापडलेल्या वस्तुंमुळे खळबळ पतरातू येथे भावाची हत्या करून मृतदेह अंगणात पुरल्याचा आरोप असलेली चंचल अडीच महिने पोलिसांना चकवा देत राहिली. सुमारे अडीच महिन्यांपासून कुठेही अनोळखी मृतदेह सापडला की, चंचल स्वत: तिथे जाऊन मोबाइलवरून मृतदेहाचा फोटो काढायची आणि तो आपला भाऊ नसल्याचं पोलिसांना सांगायची, असं पोलिसांचं म्हणणं आहे. यादरम्यान पोलिसांना किंवा कुटुंबीयांना समजलंही नाही की त्यांच्यासोबत फिरणाऱ्या चंचलनेच आपल्या भावाची हत्या करून त्याचा मृतदेह पुरला आहे. पोलिसांना दिलेल्या जबानीत मुलीने तिचा भाऊ अंमली पदार्थांचे व्यसन करायचा, असं सांगितलं. त्या दिवशीही त्याने ओव्हरडोज घेतले होते, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. घाबरून तिने कोणालाही न सांगता मृतदेह घरातच पुरला. कुटुंबीयांनीही रोहित ड्रग्ज घेत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. चुटिया येथे राहणारा रोहितचा चुलत भाऊ दिलीप त्याला आपल्याकडे बोलावून त्याच्यावर उपचार करत होता. 30 जून रोजी चंचलने रोहितला फोन करून पतरातू येथे बोलावलं. तिने स्वतः त्याला कांके रोडवरील चांदणी चौकातून सोबत घरी आणलं. या दिवसापासून रोहित बेपत्ता होता. जी सासरी मृत्युमुखी झाली ती माहेरी जिवंत सापडली, नेमकं काय प्रकरण वाचा चंचल आपला भाऊ रोहितच्या मृत्यूचं कारण ड्रग्जचा ओव्हरडोस देत असल्याचं पोलिसांनी सांगितलं, मात्र भावाची हत्या चंचलनेच केली आहे. चौकशीत एका तरुणाचं नाव पुढे आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 जून रोजी चंचलने त्याच मुलासोबत मिळून रोहितची हत्या करून मृतदेह पुरला. सध्या पोलीस कुटुंबीयांच्या जबाबावरून पुढील तपास आणि कारवाई करण्यात गुंतले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.