जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / शिक्षकाचं राक्षसी कृत्य; 'या' कारणामुळे 7 वर्षीय विद्यार्थ्याच्या अंगावर फेकलं उकळतं पाणी

शिक्षकाचं राक्षसी कृत्य; 'या' कारणामुळे 7 वर्षीय विद्यार्थ्याच्या अंगावर फेकलं उकळतं पाणी

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

संतापलेल्या शिक्षकाने या मुलाच्या अंगावर गरम पाणी ओतलं. रिपोर्टनुसार, पीडित मुलगा 40 टक्के भाजला आहे (Teacher Thrown Hot Water on Student)

  • -MIN READ Karnataka
  • Last Updated :

बंगळुरू 11 सप्टेंबर : कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील एका शाळेत 7 वर्षांच्या विद्यार्थ्याने पँटमध्ये शौच केलं. यामुळे संतापलेल्या शिक्षकाने या मुलाच्या अंगावर गरम पाणी ओतलं. रिपोर्टनुसार, पीडित मुलगा 40 टक्के भाजला आहे. मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणातील आरोप शिक्षक फरार आहे. पोलीस आणि कुटुंबीयांनी अडीच महिने घेतला बेपत्ता तरुणाचा शोध, अखेर घरातच सापडला पुरलेला मृतदेह जिल्ह्यातील मस्की तालुक्यातील संते कल्लूर गावात 2 सप्टेंबर रोजी ही घटना घडली, असं पोलीस पथकाने सांगितलं. शिक्षणाधिकाऱ्यांच्या एका पथकाने रुग्णालयात दाखल विद्यार्थ्याची भेट घेतली. त्यांना विद्यार्थ्याकडून घटनेची माहिती घ्यायची होती, मात्र तो बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याच्या आई-वडिलांनाही याबाबतची काही माहिती नाही. याप्रकरणी पोलिसांनी गावकऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. या घटनेनंतर बेपत्ता झालेल्या शिक्षकानेच हे सगळं केलं असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी आरोपी शिक्षकाची ओळख पटवली आहे. त्याचं नाव हुलीजेप्पा असं आहे. घटनेनंतर आरोपीने पीडित मुलाच्या पालकांना तक्रार नोंदवू नये यासाठी धमकावलं असल्याचंही समोर आलं आहे. लवकर दरवाजा न उघडल्याने डॉक्टरसोबत केलं भयंकर कृत्य; बारामतीतील संतापजनक घटनेचा VIDEO पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, आम्हाला या घटनेची माहिती मिळाली, मात्र याबाबत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. आमच्या टीमने शाळेला भेट दिली आहे. वास्तविक ही बाब शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येते. अशा परिस्थितीत विभाग स्वत:हून दखल घेऊन कारवाई करू शकतो. काही दिवसांपूर्वी राज्यातील अंगणवाडी देखभाल केंद्रात एका शिक्षकाने मुलाला जाळल्याची घटना समोर आली होती. या मुलाने शिक्षकाच्या अंगावर लघवी केल्याने शिक्षकाने हे राक्षसी कृत्य केलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात