नागपूर, 07 जानेवारी : देशात कालपासून अचानक थंडीचा कडाका वाढला आहे. देशात प्रामुख्याने उत्तर भारतात अचानक तापमानात घट झाल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. याचा परिणाम नागपूर आणि परिसरात होत आहे. राज्यात थंड वारे वाहू लागल्याने नागपूरमध्ये अचानक पारा घसरला आहे. नागपूरमध्ये अचानक पारा घसरल्याने नागपूरात कडाक्याच्या थंडीमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. दरम्यान पुढच्या दोन दिवसांत राज्यात कडाक्याची थंडी सुरू पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
नागपूर शहरात गेल्या दोन दिवसांत दोन अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. हे दोन्ही मृत्यू थंडीने झाल्याची शंका व्यक्त केले जात आहे. शहरातील मोरभवन जवळ 70 वर्षीय वृद्ध मृतावस्थेत आढळले आहेत तर गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीत 35 ते 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान यांचा मृत्यू थंडीमुळे झाल्याचे बोलले जात आहे. हे दोन्ही जण कडाक्याच्या थंडीत उघड्यावर झोपले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान पुढील तपासणीनंतर मृत्यूच्या कारणांचा खरा रिपोर्ट येणार असल्याचे बोलले जात आहे.
i) Abatement of Cold Wave and Cold Day conditions over northwest India after 24 hours.
— India Meteorological Department (@Indiametdept) January 6, 2023
ii) Dense to very dense fog conditions over many parts of Punjab and Haryana & Chandigarh during next 24 hours and decrease in intensity & distribution thereafter.
हे ही वाचा : मकर संक्रांतीच्या तोंडावर सांगलीतील शेतकरी अडचणीत, पाहा Video
याचबरोबर गोंदिया आणि विदर्भात सलग तिसऱ्या दिवशी सर्वात कमी तापमानाची नोंद गोंदिया जिल्ह्यात झाली आहे. जिल्ह्याचे तापमान 11.8 अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. तापमानात सातत्याने घट होत असल्याने जिल्हा गारठल्याचे चित्र असून याचा दैनंदिन वेळापत्रकावर सुद्धा काहीसा परिणाम झाला आहे. तर लोकं शेकोटीसह गरम कपड्याचा आधार घेत आहेत.
उत्तर भारतात गेल्या दोन दिवसांपासून सर्व राज्यांत दाट धुके तसेच थंडीची लाट आली आहे. त्यामुळे राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, उत्तराखंड, हरियाणा भागांत तीव्र थंडी आणि दाट धुके पसरले आहे. येत्या ७ ते ९ जानेवारीदरम्यान हिमालयीन भागात पश्चिमी चक्रवाताची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे उत्तर भारतातील सर्वच राज्यांत थंडीच्या लाटेबरोबरच दाट धुक्यामध्ये वाढ होणार आहे.
हे ही वाचा : ग्रामीण भागात वाढली रिल्सची क्रेझ! सोशल मीडियाचा वापर ठरतोय जीवघेणा, Video
या स्थितीमुळे उत्तर भारतातून राज्याकडे तीव्र थंड वारे वाहणार आहेत. त्यामुळे राज्यात येत्या २४ तासांत थंडीचा कडाका वाढणार आहे. सध्या राज्यात किमान आणि कमाल तापमानात सरासरीपेक्षा तीन ते चार अंशांनी वाढ आहे. मात्र, उत्तर भारताकडून राज्याकडे थंड वारे वाहू लागल्यानंतर अचानक वातावरणात बदल होऊन थंडी वाढणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.