बीड, 05 जानेवारी : कोरोना महामारीनंतर सोशल मीडियाचा वापर अनेक पटींनी वाढला आहे. डिजिटल युगाचा आपल्या आरोग्यावर तसेच आपल्या जीवनावर मोठा परिणाम होत आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन लागू झाल्याने लोकांचा सोशल मीडियाकडे अधिक कल वाढला आहे. यात तरुणांचा अधिक समावेश असून सोशल मिडियाच्या अतिवापरातून अनेकजण नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलत आहेत.
आधुनिकतेच्या युगात सर्वांच्याच हाती स्मार्टफोन आले. माणसांच्या गरजा जशा वाढत गेल्या तसे तसे नवे फीचर्स अँड्रॉइड फोनमध्ये दाखल झाले आहेत. याचा काहींनी चांगला उपयोग केला तर काहींनी दुरुपयोग. मात्र, सोशल मिडियाच्या वापरामुळे आरोग्यावर देखील घातक परिणाम होत आहेत.
ग्रामीण भागातही रिल्सची क्रेझ
वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून रिल्स अर्थात व्हिडिओ बनवून सोशल साइटवर अपलोड करणे ही बाब काही वर्षांपूर्वी शहरापूर्ती मर्यादित होती. मात्र, आता बीड सारख्या ग्रामीण भागामध्ये देखील रिल्स तयार करण्यामध्ये तरुणाई गुरफटून गेली आहे. काही तरुण दिवस रात्र रिल्स बनवणे आणि रिल्स पाहण्यामध्ये वेळ वाया घालत आहेत.
तासंतासाचा वेळ वाया
स्मार्टफोनमध्ये व्हाट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक यासारखे गुंतून ठेवणारे ॲप आहेत. मात्र त्याही पलीकडे आजची तरुणाई रिल्स तयार करण्यामध्ये अडकून पडली आहे. अनेकदा एखादी रिल्स पाहिली की त्यापुढील रिल्स पाहण्याची इच्छा होती यातून तासंतासाचा वेळ वाया जातो.
Video : 'या' योजनेतून उभारा स्वत:चा व्यवसाय, अनुदानासह मिळेल मोफत प्रशिक्षण!
सोशल मिडियाचा अतिवापर धोक्याचा
रिल्सच्या जमान्यात अनेकजण दुसऱ्याचे रिल्स पाहून स्वत: रिल्स बनवू लागते. मात्र सोशल मिडियाच्या या अशा वापरातून लाईक्स कमी मिळाल्या तर नैराश्य वाढत आहे. यातून अनेकजण टोकाची पाऊल उचलून जीवन देखील संपवत असल्याच्या घटना समोर येते आहेत. त्यामुळे सोशल मिडियाचा वापर जरा जपून करणे आवश्यक बनलं असल्याच मानसोपचारतज्ञ, मोहम्मद मुजाहिद यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.