नागपूर 17 सप्टेंबर : नागपुरात हत्येच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता आणखी एक खळबळजनक घटना जिल्ह्यातून समोर आली आहे. या घटनेत एका पतीने आपल्या पत्नीची हत्या केली. यानंतर स्वतः पोलिसांत जाऊन त्याने आपल्या गुन्ह्याबद्दलची माहिती पोलिसांना दिली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नागपूर : पत्नी असतानाही प्रेयसीसोबत लिव्ह इनमध्ये राहायचा प्रियकर, संशयास्पद मृत्यू ही घटना पाचपावली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लस्करीबाग येथे घडली. यात मध्यरात्रीच पतीने पत्नीची हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, घरगुती कारणावरुन दोघांमध्ये सतत वाद होत असे. ज्यादिवशी पतीने पत्नीची हत्या केली, त्या रात्रीही दोघांमध्ये काहीतरी कारणावरुन वाद झाला होता. यानंतर रागात पतीने पत्नीची हत्या केली. मृत महिलेचा पती मेओ रुग्णालयातील मॉर्च्यूरीमध्ये काम करायचा. मृतक महिलेचं नाव सोनू परशुराम ब्राम्हणे असं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पत्नीची हत्या केल्यानंतर स्वतःच पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांनी आपल्या केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस सध्या या घटनेचा अधिक तपास करत आहेत. वर्ध्याच्या कारागृहात दोन कैद्यात हाणामारी, दुपट्ट्यात दगड बांधून…; नेमकं काय घडलं? 3-4 दिवसांपूर्वीच नागपुरातून आणखी एक घटना समोर आली होती. ज्यात ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. मृत प्रियकर हा प्रेयसीसोबतच तिच्या घरात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होता. ही घटना प्रतापनगरात उघडकीस आली. अमित बहिरे (वय - ३३, शिवनगर, सिंधी कॉलनी) असे मृत प्रियकराचे नाव होतं. त्याचे लग्न झाले होते. तसेच त्याला एक 8 वर्षांचा मुलगाही आहे. त्याच्या लग्नाला कुटुंबीयांचा विरोध होता. मात्र, तरी त्याने कुटुंबाच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला होता. यामुळे पत्नीच्या कुटुंबाशी त्याचा संबंध नव्हता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.