मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नागपूर : पत्नी असतानाही प्रेयसीसोबत लिव्ह इनमध्ये राहायचा प्रियकर, संशयास्पद मृत्यू

नागपूर : पत्नी असतानाही प्रेयसीसोबत लिव्ह इनमध्ये राहायचा प्रियकर, संशयास्पद मृत्यू

त्याची पत्नी ही सध्या 9 महिन्यांची गर्भवती आहे.

त्याची पत्नी ही सध्या 9 महिन्यांची गर्भवती आहे.

त्याची पत्नी ही सध्या 9 महिन्यांची गर्भवती आहे.

  • Published by:  News18 Desk
नागपूर, 13 सप्टेंबर : नागपुरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. बलात्काराच्या, हत्येच्या घटना समोर येत आहेत. यातच आता ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या प्रियकराचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मृत प्रियकर हा प्रेयसीसोबतच तिच्या घरात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होता. ही घटना प्रतापनगरात उघडकीस आली. काय आहे संपूर्ण प्रकरण - अमित बहिरे (वय - ३३, शिवनगर, सिंधी कॉलनी) असे मृत प्रियकराचे नाव आहे. त्याचे लग्न झाले होते. तसेच त्याला एक 8 वर्षांचा मुलगाही आहे. इतकेच नव्हे तर त्याची पत्नी ही सध्या 9 महिन्यांची गर्भवती आहे. त्याच्या लग्नाला कुटुंबीयांचा विरोध होता. मात्र, तरी त्याने कुटुंबाच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला होता. यामुळे पत्नीच्या कुटुंबाशी त्यांचा संबंध नव्हता. दरम्यान, गेल्या सात वर्षांपूर्वी अमितची शीतलशी (34, नाव बदललेले आहे) ओळख झाली. शीतलला 12 वर्षांची मुलगी आहे. तर तिच्या पतीचे निधन झाले आहे. ती खासगी काम करते. तर अमितसुद्धा खासगी नोकरी करत होता. या दोघांची ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर अमित हा थेट आपली प्रेयसी शीतलच्या घरी येऊन राहायला लागला. याचदरम्यान, पती अमित याचे शीतलसोबत अनैतिक संबंध असल्याची कुणकुण त्याच्या पत्नीला लागली. त्यामुळे तिने याप्रकरणी पती व त्याची प्रेयसी शीतलच्या विरोधात भरोसा सेलमध्ये तक्रार दिली. यादरम्यान, भरोसा सेलने त्यांच्यात समेट घडवून आणला. त्यानंतर तो पत्नीला घरखर्चाला पैसे देत होता. तसेच प्रेयसीच्या घरी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्येही राहत होता. हेही वाचा - नागपूर : लग्नाला विरोध म्हणून उचललं टोकाचं पाऊल, प्रेयसीचा मृत्यू तर प्रियकर.. दरम्यान, रविवारी दुपारच्या सुमारास अमित हा शीतलच्या घरी आला. यानंतर एका तासाने शीतल आपल्या मुलीला घेऊन सीताबर्डी येथे खरेदीसाठी निघून गेली होती. ती चार वाजताच्या सुमारास परत आली असता अमित तिला मृतावस्थेत दिसला. यानंतर तिने याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केल्यावर मृतदेह मेडिकलमध्ये पाठवला आहे. याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पोलीस पुढील तपास करत आहेत.
First published:

Tags: Death, Nagpur News

पुढील बातम्या