मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

वर्ध्याच्या कारागृहात दोन कैद्यात हाणामारी, दुपट्ट्यात दगड बांधून...; नेमकं काय घडलं?

वर्ध्याच्या कारागृहात दोन कैद्यात हाणामारी, दुपट्ट्यात दगड बांधून...; नेमकं काय घडलं?

याप्रकरणी अधिक तपास वर्धा पोलीस करीत आहे.

याप्रकरणी अधिक तपास वर्धा पोलीस करीत आहे.

याप्रकरणी अधिक तपास वर्धा पोलीस करीत आहे.

  • Published by:  News18 Desk
नरेंद्र मते, प्रतिनिधी वर्धा, 16 सप्टेंबर : सध्या तरुणांमध्ये गुंडगिरी प्रवृत्ती वाढली आहे. हीच गुंडगिरी अनेकदा तुरुंगातही पाहायला मिळते. अशीच एक घटना समोर आली आहे. वर्धा कारागृहात दोन कैद्यात हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. दुपट्ट्यात दगड बांधून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली. ही घटना बराक क्रमांक 8 मध्ये रात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेची नोद वर्धा शहर पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. शिक्षाधीन बंदी आणि न्यायदीन बंदीवानात अगदी किरकोळ कारणातून झालेल्या वादात शिक्षाधीन बंदीवानाने न्यायदीन बंदीवानाला दुपट्ट्यात दगड बांधून डोक्यावर मारहाण केली. ही घटना वर्धा जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील बॅरेक क्रमांक 8 मध्ये रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेच्या थराराने कारागृहातील इतर कैद्यांस कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. कपिल नंदकिशोर आखाडे (वय 26, रा. मारोती वॉर्ड हिंगणघाट) असे जखमी न्यायदीन बंदीवानाचे नाव आहे. तर शेख तौफिक शेख शाकीर असे हल्ला करणाऱ्या शिक्षाधीन बंदीवानाचे नाव आहे. या प्रकरणी तुरुंग प्रशासनाने वर्धा शहर पोलिसात तक्रार दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास वर्धा पोलीस करीत आहे. वर्ध्यात 50 टक्के गुन्हेगार या वयोगटातील - दरम्यान, राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सध्या गुन्हेगारांमध्ये तरुणाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. एकूण गुन्हेगारांच्या सरासरीची तुलना केल्यास वर्धा जिल्ह्यातील 50 टक्के गुन्हेगार तरुण वयोगटातील म्हणजेच 18 ते 30 वयोगटातील आहेत. या तुलनेत यापेक्षा जास्त वयोगटातील प्रौढ गुन्हेगारांची संख्या कमी आहे. हेही वाचा - मुख्याध्यापकाकडे मागितली लाच, ग्रामपंचायत सदस्यांसह उपसरपंच पतीला रंगेहाथ पकडले वर्धा जिल्हा कारागृहात एकूण 519 बंदिवान आहे. त्यात 18 ते 30 वयोगटातील 247 कैदी, 31 ते 50 वयोगटातील 180 कैदी तर 51 पेक्षा जास्त वयोगटातील 92 कैदी आहे. 200 च्या वर बंदीवान 30 वयोगटाच्या आतील आहे. ही बाब जिल्ह्यासाठी चिंताजनक आणि गंभीर आहे. ही आकडेवारी मागच्या महिन्यातील (ऑगस्ट 2022) आहे. त्यामुळे तरुणाईला गुन्हेगारीपासून दूर ठेवत त्यांना चांगल्या मार्गाला लावण्याची गरज याठिकाणी निर्माण झाली आहे.
First published:

Tags: Crime news, Wardha news

पुढील बातम्या