मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /अधिवेशनात आमदारांच्या चहाचे कप धुतले शौचालयाच्या पाण्याने; व्हिडीओ समोर आल्यानं खळबळ

अधिवेशनात आमदारांच्या चहाचे कप धुतले शौचालयाच्या पाण्याने; व्हिडीओ समोर आल्यानं खळबळ

नागपूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. आमदारांना चहा देण्यासाठी वापरत असलेल्या कपबशा धुण्यासाठी चक्क शौचालयातील पाण्याचा वापर केला जात असल्याचा व्हिडीओ कॅमेऱ्यामध्ये कैद झालं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर, 22 डिसेंबर: नागपूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. आमदारांना चहा देण्यासाठी वापरत असलेल्या कपबशा धुण्यासाठी चक्क शौचालयातील पाण्याचा वापर केला जात असल्याचा व्हिडीओ कॅमेऱ्यामध्ये कैद झालं आहे. या प्रकाराने खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ ट्विट केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

अमोल मिटकरी यांचं ट्विट

आमदारांना चहा देण्यासाठी असलेल्या कपबशा धुण्यासाठी चक्क शौचालयातील पाण्याचा वापर होत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. अमोल मिटकरी यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. 'हे आहे नागपूर हिवाळी अधिवेशनातील आमदार निवासस्थानातील उपहारगृह. हजारो कोटीचे टेंडर कंत्राटदाराला दिल्यानंतर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी कंत्राटदारांकडून विशेष टॉयलेटची व्यवस्था.' असं ट्विट मिटकरी यांनी केलं आहे.

अजित पवार आक्रमक 

दरम्यान दुसरीकडे अमोल मिटकरी यांच्या या व्हिडीओचा संदर्भ देत आमदार निवासस्थानातील गौरसोयीवरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला धारेवर धरले आहे. टॉयलेटच्या शेजारी कपबशा धुवत असल्याचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला आहे. हे नेमकं काय चाललय? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करून, त्याला काळ्या यादित टाकण्यात यावं अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.

First published:

Tags: Ajit pawar, Nagpur, Nagpur News, Winter session