नागपूर, 19 ऑक्टोबर : अवघ्या काही दिवसावर दिवाळी येऊन ठेपली आहे. सर्वत्र दिवाळीच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. बाजारपेठा देखील दिवाळीसाठी सजल्या आहेत. रंगीबेरंगी ताव, कागद, प्लॅस्टिक कापड, ॲक्रालिक शीटपासून तयार होणारे कंदील बाजारात आपण पाहतो. मात्र, नागपुरात आंध्र प्रदेश येथील कलाकारांनी बांबूपासून बनवलेले आकर्षक इको फ्रेंडली कंदील विक्रीसाठी आले आहेत. दिवाळीच्या दिवसात घरापुढे आकाश कंदील लावून घर तेजोमय करण्याची जुनी परंपरा आहे. आकाश कंदील हा आपल्या मराठी संस्कृतीतील घटक आहे. काळानुरूप या आकाशकंदिलात देखील अनेक स्थित्यंतर आणि बदल बघायला मिळाले. मूळचे आंध्र प्रदेश येथील रहिवासी असलेले नालगुंडा वेंकाया यांचे कुटुंब दर वर्षी दिवाळी निमित्त नागपुरात येतात. येथे बांबूच्या काड्यांपासून ते आकर्षक असे कंदील तयार करून विक्री करतात. यातूनच या कुटुंबाची उपजीविका भागते. अजनी येथील रिझर्व्हेशन ऑफिस येथील फुटपाथवर नालगुंडा वेंकाया यांचे दुकान स्थित आहे. Video : ‘त्या’ शेतकऱ्यांची दिवाळी अखेर गोड, माजी सनदी अधिकाऱ्यामुळे मिळाला विमा! एक महिना आधीच कामाला सुरुवात आंध्र प्रदेश येथील वेंकाया हे मागील 6-7 वर्षापासून दिवाळीच्या 1 महिना आधीच नागपुरात येतात. बांबूच्या काड्यांना छिलून त्याच्या बारीक रेषांप्रमाणे काड्या तयार करतात. या काड्यांना वैशिष्ट्यपूर्ण आकार देत विविध आकारचे कंदील तयार करतात. साधारणपणे एक कंदील तयार करण्यासाठी 2-3 तास एवढा अवधी लागतो. विशेष म्हणजे कंदील बनवण्यासाठी लागणे बांबू आंध्र प्रदेश येथूनच आणले जातात. Wardha : दिवाळीसाठी यंदा बाजारपेठेत काय आहे नवीन आणि भारी? पाहा Video कंदिलाचे वैशिष्ट्ये बांबूच्या काड्यांपासून तयार होणारे कंदील 8 इंचापासून ते 2 फुटापर्यंत कंदील उपलब्ध आहेत. याची किंमत 100 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत आहे. बाजारात प्लास्टिक, चायनीजचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, आंध्र प्रदेश येथील कलाकारांनी पारंपारिक पद्धतीने घडवलेले हे कंदील उत्तम पर्याय ठरतं आहेत. अनेक दिवस हे कंदील टिकतात. दिसण्यासाठी देखील आकर्षक आहेत त्यामुळे नागपूरकरांच्या आवडीस पात्र ठरत असल्याचे वेंकाया सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.