मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Video : ‘त्या’ शेतकऱ्यांची दिवाळी अखेर गोड, माजी सनदी अधिकाऱ्यामुळे मिळाला विमा!

Video : ‘त्या’ शेतकऱ्यांची दिवाळी अखेर गोड, माजी सनदी अधिकाऱ्यामुळे मिळाला विमा!

X
माजी

माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या प्रशासकीय अनुभवामुळे व त्यांच्या पाठपुराव्याने शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली आहे.

माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या प्रशासकीय अनुभवामुळे व त्यांच्या पाठपुराव्याने शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Satara, India

    सातारा, 19 ऑक्टोबर : तांत्रिक अडचणीमुळे पीक विम्यापासून वरकुटे मलवडी मंडळातील द्राक्ष उत्पादक शेतकरी वंचित होते. मात्र, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या प्रशासकीय अनुभवामुळे व त्यांच्या पाठपुराव्याने शेतकऱ्यांना रक्कम मिळाली आहे. 17 द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांना 3 लाख 20 हजार रुपये प्रति हेक्टर दराने रक्कम मिळाली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर विमा रक्कम खात्यात जमा झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांची दिवाळी गोड झाली आहे.

    पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक योजना 2021-22 राबविण्यात आली होती. या योजनेचा लाभ बहुतांशी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मिळाला होता. मात्र, माण तालुक्यातील वरकुटे मलवडी या कृषी मंडळातील पावसाने फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळाली नव्हती. वरकुटे मलवडी हे नव्याने निर्मित झालेले मंडळ असल्याने या ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र स्थापित झालेले नाही.

    वरकुटे, मलवडीतील शेतकरी वंचित

    शासन निर्णयातील तरतुदीनुसार सदर मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र स्थापित होईपर्यंत नजीकच्या महसूल मंडळाच्या आकडेवारीवर आधारित नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. नजीकच्या म्हसवड मंडळातील शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळत असताना वरकुटे मलवडीतील शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित होते. त्यामुळे तांत्रिक अडचण दूर करून नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी करून प्रभाकर देशमुख यांनी कृषी आयुक्तालयात पुणे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

    Video : कायदे आहेत, पण अंमलबजावणीचं काय?, शासकीय कार्यालयातील पिचकाऱ्या कायमच!

    3 लाख 20 हजार रुपये प्रती हेक्टर मदत

    प्रभाकर देशमुख यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सातारा यांनी कृषी आयुक्तालयातील मुख्य सांख्यिक यांच्याशी याबाबत पत्रव्यवहार केला. त्यानंतर मुख्य सांख्यिक यांनी एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापक यांच्याशी पत्रव्यवहार करून मलवडी व इतर मंडळातील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना तीन लाख वीस हजार रुपये प्रती हेक्टर प्रमाणे तत्काळ नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर द्राक्ष बागेच्या क्षेत्रानुसार नुकसान भरपाईची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झाली.

    Video : वृक्ष संवर्धनाची नवी क्रांती, घरबसल्या मिळेल लावलेल्या झाडांची माहिती

    कृषी आयुक्तांना भेटून दिली माहिती 

    नुकसान भरपाई रक्कम मिळायला पाहिजे होती ती मिळाली नाही. यावर शेतकऱ्यांनी माझी भेट घेतली. शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन कृषी आयुक्तालय पुणे या ठिकाणी समक्ष भेटून माहिती दिली. त्यांनी तातडीने संबंधित पीक विमा कंपनीला आदेश दिले. त्यानंतर शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली असल्याचे माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.

    दिवाळी गोड झाली

    पावसाने आमच्या फळबागेचे अतोनात नुकसान झाले होते. तांत्रिक अडचणींमुळे आम्ही नुकसान भरपाईपासून वंचित होतो. मात्र, आता आम्हाला रक्कम मिळा आहे. आमची दिवाळी गोड होणार असल्याचे काळचोंडी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी रावसाहेब कुंभार यांनी सांगितले.

    First published:

    Tags: Farmer, Insurance, Satara, Satara news, शेतकरी