नागपूर, 29 डिसेंबर : नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाच्या नवव्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधील संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नाही. आम्ही दोघं एकत्र आहोत, भाजप, शिवसेना युती आहे. आज मी संघाच्या मुख्य कार्यालयाला भेट दिली. त्याचबरोबर हेडगेवार स्मृतीस्थळालाही भेटी दिली. खूप छान वाटलं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलं? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपुरातील आरएसएसच्या मुख्यालयाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, आज मी संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. त्याचबरोबर हेडगेवार स्मृतीस्थळालाही भेट दिली. इथे येऊन खूप छान वाटलं. इथे आल्यानंतर एक वेगळी ऊर्ज मिळते. मी लहान असताना संघाच्या शाखेत जात होतो. या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नाही, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. हेही वाचा : लवासाप्रकरणात पुन्हा न्यायालयात याचिका; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले पवार कुटुंबावर… बंद दाराआड चर्चा दरम्यान दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संघाच्या मुख्यालयात आले असता त्यांनी संघाचे प्रचारप्रमुख सुनील देशपांडे आणि प्रांत प्रचारक राम हरकरे यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा केली. नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







