जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nagpur News : देवदर्शन करुन घरी येताना दोघांना मृत्यूनं गाठलं, 7 जखमी; अपघाताची भीषणता दाखवणारे PHOTO

Nagpur News : देवदर्शन करुन घरी येताना दोघांना मृत्यूनं गाठलं, 7 जखमी; अपघाताची भीषणता दाखवणारे PHOTO

नागपुरात भीषण अपघात

नागपुरात भीषण अपघात

रामटेकगड येथून देवदर्शन आणि पर्यटन करून भंडाराकडे निघालेल्या कारचा भीषण अपघात झाला. भरधाव कारने उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिली.

  • -MIN READ Nagpur,Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

उदय तिमांडे प्रतिनिधी नागपूर : देवदर्शन घेतलं आणि आता सगळं ठिक होईल या प्रसन्न मनाने पर्यटनासाठी निघाले. उत्साह नवं चैतन्य मनात साठवून पुन्हा घरी निघताना मात्र काळानं घात केला आणि कुटुंबावर शोककळा पसरली. भीषण अपघात झाला आणि होत्याचं नव्हतं झालं. रामटेकगड येथून देवदर्शन आणि पर्यटन करून भंडाराकडे निघालेल्या कारचा भीषण अपघात झाला. भरधाव कारने उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिली. या भयंकर अपघातात कारमधील दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ८ जण जखमी असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.

Accident News : भिवंडीत आइस्क्रीमचा आस्वाद घेतानाच काळाचा घाला; मृत्यूचा Live Video जखमींमध्ये तीन लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. हा अपघात एवढा भयंकर होता की कारच्या एका बाजूला पूर्ण चुराडा झाला आहे. या अपघातानंतरचे फोटो अंगावर शहारे आणणारे आहेत.

News18

News18

मिळालेल्या माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील रहिवासी राजेश भेंडारकर आपल्या कुटुंबातील काही सदस्यांसह नागपूर जिल्ह्यातील रामटेक दर्शनासाठी आले होते. रामटेक गडमंदिर येथे दर्शन करून ते आपल्या गावी परतत असताना रामटेक-भंडारा मार्गावर आरोली खंडाळा गावाजवळ उभा असलेल्या कंटेनर ट्रकला त्यांची कार धडकली.

News18लोकमत
News18लोकमत

7 सीटर कार रस्त्याच्या मधोमध उलटली.. चारही चाक हवेत, अपघाताचे कारण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल अपघात इतका भीषण होता की समोरच्या सीटवर बसलेला चालक आणि महिला जखमी अवस्थेत कारमध्ये अडकून पडली होती. सर्व जखमींना उपचारासाठी रामटेकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता परसराम भेंडारकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर उर्वरित जखमींना नागपूरला दाखल करण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात