जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Accident News : भिवंडीत आइस्क्रीमचा आस्वाद घेतानाच काळाचा घाला; मृत्यूचा Live Video

Accident News : भिवंडीत आइस्क्रीमचा आस्वाद घेतानाच काळाचा घाला; मृत्यूचा Live Video

आइस्क्रीमचा आस्वाद घेतानाच काळाचा घाला

आइस्क्रीमचा आस्वाद घेतानाच काळाचा घाला

Accident News : महामार्गावर कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेला युवक ठार.

  • -MIN READ Thane,Maharashtra
  • Last Updated :

सुनिल घरात, प्रतिनिधी भिवंडी, 9 जुलै : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघाताचं सत्र थांबवण्याचं नाव घेताना दिसत नाही. नुकतेच सम्रुद्धी महामार्गावर बस अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना मुंबई नाशिक महामार्गावर रात्रीच्या सुमारास कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात रस्त्याच्याकडेला आइस्क्रीम टेम्पोवर आइस्क्रीम खाण्यासाठी उभा असलेला एक युवक ठार झाला. तर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत.

जाहिरात

कसा घडला अपघात? मौजम फायाजऊल्ल हुसेन अन्सारी (वय 31) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाणे हद्दीत खडवली नाका या ठिकाणी रात्री नाशिककडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कंटेनर चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनरने आपल्या पुढे असलेल्या कारला ठोकर मारली. त्यामध्ये कार रस्त्यात उजवीकडे वळली असतानाच कारला वाचविण्याच्या नादात कंटेनरची रस्त्याकडेला उभ्या असलेल्या आइस्क्रीम टेम्पो गाडीला धडक दिली. त्यावेळी कामावरून घरी परतणारे चार जण या आइस्क्रीम टेम्पोजवळ आइस्क्रीम खाण्यासाठी थांबले असताना त्यांनाही जोरदार धडक बसल्याने त्यामध्ये मौजम फायाजऊल्ल हुसेन अन्सारी हा चाकाखाली आल्याने त्याचा जागेवर मृत्यू झाला. वाचा - Mumbai News : मुंबईत भीषण अपघात; भरधाव ट्रकनं चार वाहनांना चिरडलं तर इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात कारसह 3 दुचाकी व आइस्क्रीम टेम्पो या वाहनांचे नुकसान झाले आहे. या भीषण अपघातानंतर पळून गेलेल्या कंटेनर चालकाला पडघा पोलिसांनी ताब्यात घेत त्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या अपघाताची घटना तेथील लक्की हॉटेल बाहेर लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. समृद्धी महामार्गावरील सर्वात भीषण अपघात बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर आत्तापर्यंतचा सर्वात भीषण अपघात आहे. विदर्भ ट्रॅव्हल्सची खाजगी बस नागपूर वरून 30 प्रवासी घेऊन पुण्याकडे जात होती. मध्यरात्री दोन वाजेच्या दरम्यान ही बस समृद्धी महामार्गावर सिमेंटच्या कठड्याला जाऊन धडकली. या अपघातानंतर बसने पेट घेतला, त्यानंतर लागलेल्या आगीत तब्बल 25 प्रवासी होरपळून मृत्युमुखी पडले आहेत. अक्षरशः या प्रवाशांचा जळून कोरपा झाला आहे.. त्यामुळे समृद्धी महामार्गावरचा आता पर्यंतचा सर्वात भीषण असा अपघात असल्याचं सांगितलं जातंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: accident
  • First Published :
जाहिरात
जाहिरात