नागपूर, 20 मे : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. आमच्या संपर्कात तिन्ही पक्षाचे आमदार आहेत, राष्ट्रवादीचे आमदार भाजपमध्ये यायला तयार आहेत. पण आता त्यांना पक्षात आणून फायदा नाही, कारण त्यांचे सदस्यत्व रद्द होईल असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. मी कुणाचं नाव घेऊन संशय निर्माण करणार नसल्याचही त्यांनी म्हटलं आहे. मुनगंटीवार यांच्या या वक्तव्यानं खळबळ उडाली आहे.
कर्नाटक शपथविधीवरून टोला
दरम्यान आज कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आहे. या शपथविधीसाठी महाराष्ट्रातील मविआच्या नेत्यांना देखील आमंत्रण देण्यात आलं आहे. यावरूनही मुनगंटीवार यांनी मविआवर निशाणा साधला आहे. राज्यातील नेते कर्नाटकमध्ये शपथविधीसाठी नाही तर महाराष्ट्राचा भाग मागायला गेले आहेत. या संदर्भात ते संध्याकाळी पत्रकार परिषद घेतील आणि तसं पत्र देखील आणतील. आमचं सरकार होतं, तेव्हा तिथे भाजपचं सरकार असल्याची ओरड ते करत होते, असा खोचक टोला मुनगंटीवार यांनी लगावला आहे.
संजय राऊतांना टोला
यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. संजय राऊत निवडणुका घेण्याबाबत वारंवार बोलतात, त्यांनी आधी वरळी विधानसभेची निवडणूक घ्यावी, म्हणजे आपोआपच कळेल पोपट कोणाचा मेला आहे. दुसऱ्याला उगच तत्वज्ञान सांगू नये असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
दोन हजारांच्या नोटेवर प्रतिक्रिया
शुक्रवारी रिझर्व्ह बँकेकडून दोन हजारांची नोट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठली आहे. या टीकेला मुनंगटीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जसं पाणी शुद्ध करतो तसं आर्थव्यवस्था शुद्ध. करण्यासाठी नोट बदलणे आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Nagpur, Nagpur News, NCP, Sharad Pawar