मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सावधान! दिवाळीआधी नागपुरात मोठी कारवाई, 20 लाख किमतीचे भेसळयुक्त पदार्थ जप्त

सावधान! दिवाळीआधी नागपुरात मोठी कारवाई, 20 लाख किमतीचे भेसळयुक्त पदार्थ जप्त

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

अन्न व औषध प्रशासन विभागाने याठिकाणी 20 लाख किंमतीचे 10 हजार 800 किलो अन्न पदार्थ भेसळीच्या संशयवरून जप्त केले आहेत. यात खावा, खाद्यतेल, तूप, वनस्पती तेल, रवा, नमकीन या पदार्थांचा समावेश आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नागपूर 20 ऑक्टोबर : दिवाळी अगदी काही दिवसांवर आलेली आहे. अशात या काळात खाद्य पदार्थांची मागणी आपोआपच वाढते. त्यामुळे या काळात भेसळयुक्त पदार्थ बाजारात येण्याचं प्रमाणही भरपूर असतं. अशातच आता नागपुरातून मोठी बातमी समोर आली आहे. यात अन्न व औषध प्रशासन विभागाने नागपुरमध्ये मोठी कारवाई करत 20 लाख रुपये किमतीचे संशयित भेसळयुक्त पदार्थ जप्त केले आहेत.

मोठी कारवाई! दिवाळीच्या फराळात तेल वापरताना सावधान; ठाण्यात 2 कोटींच्या तेलात भेसळ

अन्न व औषध प्रशासन विभागाने याठिकाणी 20 लाख किंमतीचे 10 हजार 800 किलो अन्न पदार्थ भेसळीच्या संशयवरून जप्त केले आहेत. यात खावा, खाद्यतेल, तूप, वनस्पती तेल, रवा, नमकीन या पदार्थांचा समावेश आहे. विशेष मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन विभागाने 16 ठिकाणी धाड ठाकून ही कारवाई केली आहे. जप्त केलेले नमुने पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दिवाळीच्या तोंडावर अन्न व औषध प्रशासन विभागाने अन्नसुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या पदार्थांवर कारवाई केली.

बुधवारीच मुंबईतही तीन लाख रुपयांचं संशयित भेसळयुक्त तूप जप्त करण्यात आलं होतं. मुंबईतील अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली होती. मुंबईतील प्रशासनाच्या दक्षता विभागाला 18 ऑक्टोबर रोजी मिळालेल्या माहितीनुसार मस्जिद बंदर इथल्या ऋषभ शुद्ध तूप भांडार गोडाऊनवर ही कारवाई करण्यात आली. गोदामातून 2 लाख 99 हजार 90 रुपये किंमतीचं 400 किलो तूप जप्त करण्यात आलं.

नागपुरात आज नवा विक्रम; विष्णू मनोहर बनवतायेत 2 हजार किलो चिवडा, आदिवासींना वाटणार

जप्त करण्यात आलेल्या या तुपाचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. हे नमुने विश्लेषणासाठी पाठवण्यात आले असून अहवालाच्या अनुषंगाने पुढील आवश्यक कारवाई केली जाईल. ही घटना ताजी असतानाच नागपुरातूनही मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे दिवाळीसाठी मिठाई किंवा खाद्य पदार्थ खरेदी करताना ग्राहकांनी विशेष खबरदारी घेणं गरजेचं आहे.

First published:

Tags: Diwali, Food, Nagpur News