जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / मोठी कारवाई! दिवाळीच्या फराळात तेल वापरताना सावधान; ठाण्यात 2 कोटींच्या तेलात भेसळ

मोठी कारवाई! दिवाळीच्या फराळात तेल वापरताना सावधान; ठाण्यात 2 कोटींच्या तेलात भेसळ

मोठी कारवाई! दिवाळीच्या फराळात तेल वापरताना सावधान; ठाण्यात 2 कोटींच्या तेलात भेसळ

संबंधित पेढ्यामध्ये अन्न पदार्थांचे नमुने घेण्यात आले.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 13 ऑक्टोबर : सणासुदीच्या काळात बाजारपेठेत खाद्यतेल व दुग्धजन्य अन्नपदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. या काळात खाद्यतेल, वनस्पती इ. अन्न पदार्थांमध्ये भेसळ होण्याची तसेच कमी दर्जाचे अन्नपदार्थ उत्पादन आणि विक्री होण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्राहकांना सुरक्षित आरोग्यदाई व सकस अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत याकरिता अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने अन्न आस्थापनांच्या तपासण्या आणि अन्न दुकाने तपासण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. 4 ठिकाणी कारवाई - या मोहिमेच्या कारवाईत दि. 11 ऑक्टोबर 2022 रोजी ठाणे जिल्ह्यातील 4 पेढ्यामध्ये अचानक छापा टाकून याठिकाणी कारवाई करण्यात आली. संबंधित पेढ्यामध्ये अन्न पदार्थांचे नमुने घेण्यात आले. कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन झाल्याचे आढळल्याने तसेच अन्न पदार्थांच्या दर्जाबाबत शाशंकता निर्माण झाल्याने संबंधित अन्न पदार्थांचा उर्वरित साठा जप्त करण्यात आला. एकूण 2 कोटी 46 लाख 50 हजार 753 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.  तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे अन्न व प्रशासन विभागाने म्हटले आहे. कारवाई करण्यात आलेली 4 ठिकाणे - 1. मे. जी. पी. एस. ऑईल इंडस्ट्रीज, ठाणे 2. मे. जे. जे. ट्रेडिंग कंपनी, भिवंडी, ठाणे. 3. मे. श्री. गॅलेक्सी एन्टरप्राईजेस, काल्हेर 4. मे. श्री. गणेश मिल्क प्रॉडक्ट्स, कोपरखैरणे, नवी मुंबई हेही वाचा -  नागपूरकरांनो दिवाळीसाठी घरात चिवडा करूच नका, विष्णू मनोहरांनी करून ठेवलीये सोय

दिवाळीमध्ये यात ठेवा सोपेपणा -

आपल्या दिवाळीच्या पदार्थांना उगाचच कठीण करू नका- मिठाया आणि फराळ बनवणे हे दोन्हीही. लक्षात ठेवा, स्वयंपाकघरात खूप कष्ट घेणे म्हणजे खूप छान दिवाळी नव्हे. त्याऐवजी वेगळ्या प्रकारे विचार करा. तुम्हाला अत्यंत कष्ट करून मिठाया आणि फराळ बनवण्याची गरज नाही. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आवडणाऱ्या ठराविक पदार्थांची निवड करा आणि केवळ तेवढेच पदार्थ बनवा. किंवा, आपण एखादे चांगले क्वालिटी आईसक्रीम आणि पॅक्ड फराळ यांसारखे तयार पॅक्ड पदार्थ खरेदी करू शकता. हे सुट्ट्या मिठाईपेक्षा नक्कीच चांगले असतात आणि यावर्षीच्या उत्सवांमध्ये एक चांगली भर पडेल. लक्षात ठेवा, जे अत्यंत स्वच्छता बाळगून पॅक केले असल्याचे आपल्याला माहिती असेल केवळ असेच उत्पादन खरेदी करा, म्हणजे आपले कुटुंब निश्चिंत होऊन या सुरक्षित पदार्थांचा आनंद घेऊ शकेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: diwali , food
  • First Published :
जाहिरात
जाहिरात