जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nagpur News: विदर्भात यंदा सूर्य भाजून काढणार, तापमानाबाबत आली काळजीची बातमी!

Nagpur News: विदर्भात यंदा सूर्य भाजून काढणार, तापमानाबाबत आली काळजीची बातमी!

Nagpur News: विदर्भात यंदा सूर्य भाजून काढणार, तापमानाबाबत आली काळजीची बातमी!

यंदाचा उन्हाळा अधिक धोकादायक असण्याची शक्यता आहे. अन निनोचा वाढता प्रभाव पाहता हे वर्ष उष्ण लहरी आणि तापमान वाढीचे वर्ष ठरण्याचा अंदाज आहे.

  • -MIN READ Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

    विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 13 मार्च: जागतिक स्तरावर आणी विशेषतः भारतात 2010 पासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. त्यातच ‘ला निना’ नंतर वाढत चाललेला ‘अल निनो’चा प्रभाव पाहता 2023 हे वर्ष सुद्धा उष्ण लहरी आणि अतिशय तापमान वाढीचे वर्ष ठरेल असा अंदाज पर्यावरण आणि हवामान अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे हवामान बदल आणि तापमान वाढ ही गंभीर समस्या मानव आणि सजीव सृष्टीपुढे उभी ठाकली आहे. तर या आठवड्यात विदर्भ आणि नागपुरातील तापमानात वाढ होण्याची चिन्हे आहेत. गेल्या वर्षी उष्ण लहरींचा फटका गत 2022 या वर्षी मार्च, एप्रिल, मे आणि जून या महिन्यात अनेक उष्ण लहरी आल्या होत्या. गुजरात आणि राजस्थानमध्ये अनुक्रमे 29, 30, 31 मार्च रोजी या उष्ण लहरींनी धडक दिली होती. तसेच एप्रिल महिन्यात सुद्धा 1 व 2 या तारखेला गुजरातमध्ये तर 26 ते 30 एप्रिल दरम्यान विदर्भात उष्ण लहरी आल्या होत्या. या शिवाय 8 ते 15 मे आणि 3 ते 7 जून दरम्यान विदर्भात उष्ण लहरींचा प्रकोप जाणवला होता.

    News18लोकमत
    News18लोकमत

    महाराष्ट्रातील अनेक शहरांचे तापमान 46 डिग्रीच्या वर महाराष्ट्रातील अनेक शहरात तापमान 46 डिग्री पर्यंत गेले होते. तर चंद्रपुर मध्ये तापमान 46.8 पर्यंत गेले होते. अति तापमान आणि उष्ण लहरींचे उन्हाळ्यात 30 दिवस होते. हा गेल्या 50 वर्षातील विक्रम आहे. एकंदरीत ही आकडेवारी पाहता ही अतिशय गंभीर बाब मानली जाते. 2022 सर्वाधिक उष्ण लहरीचे वर्षे ठरले होते. यंदाच्या वर्षात देखील हा ट्रेंड कायम राहतो का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सध्याचे वातावरण हे त्याच दिशेने मार्गक्रमण करत आहे. Chhatrapati Sambhaji Nagar : पुन्हा पावसाचा इशारा! शेतकऱ्यांनो, ‘या’ पद्धतीनं घ्या पिकांची काळजी हवामानातील बदल जगासमोरील चिंतेचा विषय हवामानातील बदल, प्रदूषण आणि त्यातून उद्भवणारे अनेक नैसर्गिक प्रकोप ही समस्या जागतिक स्तरावर सर्वांत चिंतेचा विषय आहे. जगातील सर्वच देशांपुढे कमी अधिक प्रमाणात या समस्यांची झळ पोहचली आहे. दिवसागणिक वाढत चाललेले जंगलतोड, शहरीकरण, औद्योगिकरण, प्रदूषण आणि विशेषता वातावरनातील कर्बवायूचे प्रमाण (420 ppm) हे जागतिक पातळीवर तापमान आणि उष्ण लहरीस कारणीभूत आहे. जागतिक स्तरावर यावर अनेक संस्थांनी चिंता व्यक्त केली असली तरी त्या अगदी थोडक्या असल्याने या समस्यांमध्ये अधिक वाढ होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यास सर्व देशांनी पुढे येणे गरजेचे आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर तसे प्रयत्न होणे गरजेचे आहे. ऐतिहासिक तापमान वाढ 1850 ते 1950 ह्या औद्योगिक काळाच्या पूर्वीचे तापमान पाहता इ.स. 2000 नंतरची आकडेवारी पाहिल्यास लक्षात येते की 2000 मध्ये तापमान 0.67 अंशाने वाढले होते. 2005 मध्ये ते 0.91 झाले. 2010 मध्ये 0.97 अंशाने वाढले तर 2014 मध्ये ते 1.00 डिग्रीने वाढले. 2014 नंतर प्रत्येक वर्षीचे तापमान 1 डिग्री च्या वर गेलेले होते. गेल्या दोन दशकात सर्वाधिक तापमान वाढ ही 2016 मध्ये 1.28 डिग्रीने झाली आहे. याच वर्षी 19 मे रोजी राजस्थान मध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान 51 DC नोंदले गेले आहे. पावसाळी हवामानात कशी घेणार पिकांची काळजी? कृषी विभागानं दिल्या महत्त्वाच्या टिप्स अन्यथा दुष्परिणाम भोगावे लागतील मागील 100 वर्षाच्या तुलनेत वातावरणात ज्या झपाट्याने बदल झाले त्याच वेगाने येत्या 10 वर्षात बदल होत आहे. जागतिक स्तरावर या समस्येकडे गांभीर्याने विचार करत 2030 पर्यंत तोडगा निघावा, अशी अपेक्षा आहे. अन्यथा मोठ्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागू शकते, असा अंदाज पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. ‘अल निनो’चा प्रभाव. 2020 पासून 2022 पर्यंत ‘ला नीना’चा प्रभाव होता. त्यामुळे देशात चांगला पाऊस पडला, परंतु 2023 च्या सुरवातीला सामान्य(न्युट्रल)स्थिती आली आहे. पुढे ‘अल निनो’चा प्रभाव वाढणार असल्याचे नासा, जागतिक हवामान विभाग आणि इतर हवामान संस्थानी अभ्यासाअंती जाहीर केले आहे. अल निनोच्या प्रभावामुळे उन्हाळ्यात तापमान वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2023 हे वर्ष सुद्धा अत्यंत तापमानाचे वर्ष राहण्याची शक्यता आहे, असे मत इंडियन सायन्स काँग्रेस, ग्रीन प्लानेट सोसायटीचे सदस्य व हवामान अभ्यासक प्रा सुरेश चोपणे यांनी सांगितले. Sangli News: सांगलीतून द्राक्ष निर्यात वाढली, पण शेतकऱ्यांना बसला कोट्यवधींचा गंडा, Video काय आहे आजचे विदर्भातील तापमान? शहर कमाल तापमान किमान तापमान अकोला 37.9 19.4 अमरावती. 37.2. 20.3 बुलढाणा 34.8. 20.0 ब्रम्हपुरी 38.0. 19.5 चंद्रपूर 37.2. 20.4 गडचिरोली 34.2. 16.4 गोंदिया. 36.2. 17.0 नागपूर 35.7 18.9 वर्धा 36.5. 20.0 वाशिम 33.2 21.0 यवतमाळ 36.2. 19.5 आज सर्वाधिक तापमानाची नोंद ब्रम्हपुरी येथे झाली असून आजचे कमाल तापमान 38.0 तर किमान तापमान 19.5 आहे. येत्या 14,15,16,17 मार्च रोजी अकोला, अमरावती, बुलढाणा,चंद्रपूर, गडचिरोली, वाशीम,यवतमाळ इत्यादीसह विदर्भातील काही भागात विजांच्या कडकडाट व वादळासह पावसाच्या सरीवर बरसण्याची शक्यता वर्तवली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात